शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदींच्या "बुलेट" स्वप्नांना शिवसेनेचा सुरुंग; ठाण्यातील जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव अखेर दप्तरी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 21:20 IST

Bullet Train: तिकडे मुंबईत मेट्रोच्या कांजुरमार्ग वरील कारशेडला केंद्राने ब्रेक लावल्यानंतर आता त्याचा वचपा काढण्यासाठी सत्ताधारी शिवसेना वाट पाहत होती. त्यानुसार बुधवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच, वारंवार हा प्रस्ताव का आणला जात आहे, असा सवाल भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी  उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव चवथ्यांदा महासभेसमोर मंजुरीसाठी पटलावर आला होता. मात्र वारंवार हा प्रस्ताव कशासाठी आणला जात आहे. असा सवाल भाजपच्या नगरसेवकाने उपस्थित केला असता, तो प्रस्तावच दप्तरी दाखल करण्याचे असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले. एकीकडे ठाण्यात भाजप बुलेट ट्रेनच्या जागा हस्तांतरणाच्या या प्रस्तावावरुन शिवसेनेला अडचणीत आणले असे वाटत होते. मात्र त्यांच्या नगरसेवकांनी सपशेल नांगी टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणत्याही स्वरुपाची चर्चा न करता हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प अखेर सत्ताधारी शिवसेनेने गुंडाळून टाकला.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प ओळखला जातो. ठाणे  महापालिका क्षेत्नातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रि या गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात संपादित होणा:या खासगी जमिनींसाठी प्रति हेक्टर ९ कोटी रु पये मोबादला दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पात महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने गेल्यावर्षी केली होती. तसेच या जागेच्या बद्दल्यात ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रु पये मोबदला देण्याची तयारी दाखिवली होती. त्यानुसार मोबदला घेऊन ही जागा एनएचएसआरसीएलच्या नावे करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने वर्षभरापुर्वी तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी आतापर्यंत चवथ्या वेळेस महासभेच्या विषय पटलावर ठेवण्यात होता. त्यातही भाजप पहिल्यांदाच या महासभेला हजर राहिल्याने बुलेट ट्रेनच्या या प्रस्तावाला अधिक महत्व प्राप्त झाले होते.

तिकडे मुंबईत मेट्रोच्या कांजुरमार्ग वरील कारशेडला केंद्राने ब्रेक लावल्यानंतर आता त्याचा वचपा काढण्यासाठी सत्ताधारी शिवसेना वाट पाहत होती. त्यानुसार बुधवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच, वारंवार हा प्रस्ताव का आणला जात आहे, असा सवाल भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी  उपस्थित केला. त्याला भाजपचे इतर नगरसेवक साथ देतील असे वाटत होते. मात्र इतर नगरसेवकांनी यावर कोणतीच भुमिका घेतली नाही. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या बाबतीत मौनच बाळगल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यांच्या या निर्णयामुळे एक प्रकारे मोदी यांच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम आणि मुंबई मेट्रोच्या कांजुरमार्ग येथील कारशेडचा वचपा काढण्याचे काम ठाण्यात शिवसेनेने केले आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना