सूतिकागृहाचा प्रस्ताव दुर्लक्षित?
By Admin | Updated: September 15, 2015 23:08 IST2015-09-15T23:08:13+5:302015-09-15T23:08:13+5:30
शहरातील मध्यवर्ती भागात टिळकपथावर केडीएमसीच्या सूतिकागृहाची वास्तु आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या वास्तूला नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करुन ठेवले आहे.

सूतिकागृहाचा प्रस्ताव दुर्लक्षित?
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
शहरातील मध्यवर्ती भागात टिळकपथावर केडीएमसीच्या सूतिकागृहाची वास्तु आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या वास्तूला नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करुन ठेवले आहे. आता तर ती पडीक, दुर्लक्षित वास्तू असून ते सूतिकागृह आहे की खंडहर असा प्रश्न निर्माण होत आहे. भटकी कुत्री, उंदीर-घुशींसह, झाडा-झुडपांचा कचरा, यामुळे ती वास्तू बकाल झाली आहे. परिणामी डासांसह अन्य प्रार्दुभावाचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. महापालिकेने ते एखाद्या ट्रस्टला द्यावे, तोच त्याचे बांधकाम करेल व अद्ययाबत सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल साकारेल, असा प्रस्ताव येथील नगरसेवकाने महापालिकेच्या अधिका-यांना दिला होता. परंतु त्याकडे प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
याच वॉर्डात नेहरु मैदान हे महापालिकेचे खेळाचे एकमेव मैदान आहे. त्या मैदानाचाही विकास करण्यात यावा असा प्रयत्न नगरसेवकाने केला होता, परंतु तोही धुळखात पडला होता. आता कुठे त्या संदर्भातील कागदपत्रे एका टेबलावरुन दुस-या टेबलावर पुढे सरकत आहेत. या व्यतिरीक्त परिसरात मनोरंजनाचे ठिकाण नाही. सुमारे ९ हजार लोकवस्ती असून बहुतांशी रहीवासी हे उच्चभ्रू आहेत. बहुतांशी नागरिकांकडे चारचाकी वाहने आहेत, परंतु इमारती जुन्या प्लॅनिंगच्या असल्याने या ठिकाणची वाहने ही रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे आधीच गल्लीबोळातले रस्ते वाहने उभी असल्याने आणखीनच अरुंद होत आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव असून त्यासाठी जागा नसल्याचे सांगण्यात आले. कचराकुंडी मुक्त वॉर्ड अद्यापही झालेला नाही. नेहरु मैदानातील एका कडेला असलेली कुंडी हटता हटत नसल्याने नगरसेवकाच्या नाकीनऊ आले आहेत. येथिल अंतर्गत रस्त्यांवर केडीएमटी येत नाही. हा भाग स्थानकालगत असल्याने परिवहनाची गरजही नाही. फडके रोडनजीक फेरीवाल्यांचा प्रश्न भेडसावत आहे. याच ठिकाणी विशिष्ट समाजाचीही वस्ती असून त्या ठिकाणी कच-याची समस्या गंभीर आहे. तेथील रहिवासी स्वत:च कचरा रात्रीतच घराबाहेर टाकतात. त्यामुळे तेथे भटकी कुत्री जातात, अनेकदा त्यामुळेही आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
वॉर्डात पाण्याची समस्या नाही. काही अपवाद वगळता कचराही नाही. सूतिकागृहा संदर्भात प्रस्ताव तीन-चार आयुक्तांसमोर ठेवला, पण त्याचे काहीच झाले नाही. रस्ते अरुंद असल्याने आता बाजुला असलेल्य गटारी रस्त्याच्या लेव्हलला आणल्या असून त्या जागेत चारचाकींचे पार्किंग होणार. एकही वाचनालय बंद नाही हे विशेषच आहे.
- प्राजक्त पोद्दार, नगरसेवक