शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांच्या तत्परतेमुळे सहा तोळ्यांचे दागिने आणि रोकड असलेली बॅग मिळाली परत

By जितेंद्र कालेकर | Updated: August 19, 2019 22:42 IST

सांगली येथून अंबरनाथ येथील नातेवाईकाकडे पूजेच्या निमित्ताने जाणाऱ्या कांबळे कुटूंबियांची दागिने आणि रोकड असलेली बॅगच कल्याण फाटा येथील रिक्षा स्टॅन्डवर विसरली. ही माहिती मिळताच डायघर पोलिसांनी मोठया तत्परतेने ती शोधून संबंधितांना ती सुखरुपरित्या परत केली.

ठळक मुद्देडायघर पोलिसांनी दाखविली तत्परता सांगलीतून अंबरनाथला आलेल्या कुटूंबाला मिळाली मदत एक लाख ८० हजारांचे दागिने मिळाले सुखरुप

ठाणे : डायघर पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रत्येकी तीन तोळ्यांचे दोन सोन्याचे मंगळसूत्र आणि रोकड असलेली बॅग सांगली येथील राजू कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळाल्याची घटना रविवारी घडली. आपला ऐवज पुन्हा काही तासांनी जसाच्या तसा मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.सांगली येथील रहिवासी राजू कांबळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह अंबरनाथ येथील आपल्या बहिणीच्या नवीन घराच्या गृहप्रवेशपूजेसाठी १८ आॅगस्ट रोजी कल्याणफाटा येथे एका वाहनाने सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आले होते. प्रवासाच्या घाईगडबडीत त्यांच्याकडील प्रत्येकी तीन तोळ्यांची दोन मंगळसूत्रे आणि दोन हजार रुपयांची रोकड असलेली बॅग ते कल्याणफाटा येथील रिक्षास्टॅण्डवर विसरले. अंबरनाथ येथील बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. या कुटुंबातील दीपाली आगवणे यांनी तत्काळ शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क करून ही बॅग कल्याणफाटा येथे विसरल्याची माहिती दिली. जाधव यांनी याची गांभीर्याने दखल घेत बीट क्रमांक एकचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण आंधळे आणि राजेंद्र सोनवणे यांना ही बॅग शोधण्यासाठी सूचना केल्या. या दोन्ही पोलीस शिपायांनी कल्याणफाटा चौक याठिकाणी जाऊन बॅगेचा शोध घेतला. तेव्हा त्यांना एक काळ्या रंगाची बॅग मिळाली. त्यानुसार, राजू कांबळे यांच्याशी शीळ-डायघर पोलिसांनी संपर्क करून खातरजमा करून त्यांच्या ताब्यात ही बॅग दिली. बॅगेमध्ये सहा तोळ्यांची दोन मंगळसूत्रे आणि दोन हजारांची रोकड तसेच कपडे असा संपूर्ण ऐवज अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे