अंकुश, भरत आणि भावोजी प्रचारात

By Admin | Updated: February 12, 2017 03:42 IST2017-02-12T03:42:50+5:302017-02-12T03:42:50+5:30

मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष मराठी कलाकारांना सहभागी करून घेणार आहेत, तर आमचे नेते हेच आमचे स्टार प्रचारक असल्याने आम्ही

In the promotion of Ankush, Bharat and Bhojooji | अंकुश, भरत आणि भावोजी प्रचारात

अंकुश, भरत आणि भावोजी प्रचारात

ठाणे : मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष मराठी कलाकारांना सहभागी करून घेणार आहेत, तर आमचे नेते हेच आमचे स्टार प्रचारक असल्याने आम्ही कलाकार मंडळींना प्रचारात सहभागी करून घेणार नसल्याची भूमिका भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी घेतली आहे.
सध्या उमेदवार आपापल्या पातळीवर प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. आपला प्रचार इतरांपेक्षा आगळावेगळा असावा, यासाठी उमेदवारही त्यांच्यापरीने आखणी करीत आहे. दि. १६, १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी प्रचाराला खरा रंग चढणार आहे. या प्रचारात सर्व पक्षांचे श्रेष्ठी मोठ्या ताकदीने उतरणार आहेत. तत्पूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसे आणि शिवसेना मराठी कलाकार मंडळींची मदत घेणार आहेत. या दोन्ही पक्षांनी काही कलाकारांची नावे सांगितली, तरी प्रत्यक्षात आणखी कोणत्या आणि किती कलाकारांची भर पडेल किंवा नाही, हे त्याच वेळी पाहायला मिळेल.
आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे हे दोन कलाकार निश्चितच शिवसेनेच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. परंतु, त्यांच्याव्यतिरिक्त कोणते कलाकार सहभागी होतील, हे आता सांगू शकत नाही. कलाकार मंडळी मोठ्या प्रमाणात येणार नसली, तरी ती येईल, हे मात्र निश्चित असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. भरत जाधव, अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री यांच्याव्यतिरिक्त आणखीन कलाकार मंडळी मनसेच्या प्रचारात सहभागी होणार आहे. १६, १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी कलाकार ठाण्यातील प्रचारात सहभागी होतील. भरत जाधव हे १६ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमासाठी ठाण्यात येत असून त्यानंतर दोन तास पक्षाच्या प्रचारासाठी देणार आहेत, अशी माहिती मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
कलाकार मंडळींचे कोणतेही नियोजन काँग्रेसने केलेले नाही. आमचे कलाकार अशोक चव्हाण आणि नारायण राणे आहेत. राणे यांच्या १५ फेब्रुवारीला दोन सभा असणार आहेत. चव्हाण यांच्या सभेची तारीख लवकरच निश्चित होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर यांनी दिली. राष्ट्रवादीचे
काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीही आम्ही कलाकार प्रचाराला आणणार नसल्याचे सांगितले. ही कल्पना चांगली असली तरी कलाकारांच्या सहभागामुळे मतदान वाढते, असे मला वाटत नाही, असे भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

कलाविश्वाशी संबंधित उमेदवारांकडून निमंत्रण
सिने व नाट्य कलाकार हे उमेदवारांच्या प्रचारात त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे तरी येतात किंवा काही उमेदवार पैसे देऊन त्यांना प्रचारात उतरवतात. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये हजर राहिलेल्या ज्या नेत्यांचे पेज थ्रीवर फोटो झळकतात, त्यांच्या प्रचारात ते कलाकार आणतात. मात्र, सध्या उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागापासून आयकर विभागाचे लक्ष असल्याने उगाचच चौकशीचा ससेमिरा पाठी लागू नये, याकरिता काही उमेदवार कलाकारांना टाळण्याचीही शक्यता आहे.

Web Title: In the promotion of Ankush, Bharat and Bhojooji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.