मुरबाडचे प्रगतिशील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST2021-07-04T04:27:08+5:302021-07-04T04:27:08+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुरबाड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, कृषी सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव रामचंद्र पवार (वय ९४) यांचे ...

Progressive farmers of Murbad | मुरबाडचे प्रगतिशील शेतकरी

मुरबाडचे प्रगतिशील शेतकरी

लाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुरबाड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, कृषी सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव रामचंद्र पवार (वय ९४) यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले. भाजपचे नगरसेवक नारायण पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार यांचे ते वडील होत. मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरात शंकरराव पवार यांची प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख होती. ते शेतकऱ्यांची प्रगती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत होते. त्यांनी कृषी सोसायटीचे चेअरमनपदही भूषविले होते. मुरबाड तालुक्यातील आदिवासींच्या प्रश्नांसाठी ते कार्यरत होते. तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार होण्यासाठी ते मदत करीत असत. त्यांनी पोलीस पाटील पदावरही काम केले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर टोकावडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Progressive farmers of Murbad