शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक बारातास धरणो आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:43 IST

बॉम्बे युनिवरसीटी अ‍ॅन्ड कॉलेज टिचर युनियन (बुक्टू) या संघटनेचे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक धरणे आंदोलन छेडणार आहेत . मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील सर्व कॉलेजचे प्राध्यापक या आदांलनात सहभागी होतील. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देसातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांनी वेतन निश्चितीमुंबई विद्यापीठाकडून शिक्षकांची होणारी छळवणूक त्वरीत थांबवण्यासहविद्यापीठ परिनियमातील रजा नियमांचे उल्लंघन करणा:या प्राचार्यांवर कारवाई

ठाणे  : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांनी वेतन निश्चिती करायची आहे. पण मुंबई विद्यापीठाच्या विविध कामकाजातील दिरंगाई व ढिसाळपणाचा आरोप करीत वेतन निश्चितीसाठी प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये व काही प्राध्यापक विद्यापीठाच्या प्रवेशव्दारवर जावून बारातास धरणो आंदोलन 22 मार्चला सकाळपासून छेडणार आहेतबॉम्बे युनिवरसीटी अ‍ॅन्ड कॉलेज टिचर युनियन (बुक्टू) या संघटनेचे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक धरणे आंदोलन छेडणार आहेत . मुंबई विद्यापीठाच्या नियंत्रणातील सर्व कॉलेजचे प्राध्यापक या आदांलनात सहभागी होतील. ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. काही प्राध्यापक विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावरील आंदोलनात सहभागी होणार असून काही महाविद्यालयांच्या प्रवेशव्दारांवर आंदोलन छेडणार असल्याचे बुक्टूचे महासचिव डॉ. मधू परांजपे यांनी सांगितले.सुमारे चार हजार पेक्षा जास्त शिक्षकांची वेतननिश्चितीच्या शिबिरांचे आयोजन मुंबई विद्यापीठ करू शकेल का अशी शंकाच बुक्टूला आहे. यास अनुसरून बुक्टू कार्यकारी समिती सदस्य, सिनेट व विद्या समिती (अकैडेमिक कौन्सिल) सदस्यांच्या बैठकीत तीव्र धरणो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये विविध समस्यांबाबत गंभीर अस्वस्थता आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व त्यावर ठोस उपाययोजना करायला विद्यापीठास भाग पाडण्यासाठी शिक्षकांनी मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. तसेच प्रत्येक महाविद्यालयातील जास्तीत जास्त शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बुक्टू चे अध्यक्ष डॉ. गुलाब राजे व महासचिव डॉ. मधू परांजपे यांनी केले आहे.           मुंबई विद्यापीठाकडून शिक्षकांची होणारी छळवणूक त्वरीत थांबवण्यासह विद्यापीठ प्रशासनाने वारंवार आश्वासने देऊनही आश्वासित प्रगती योजना (कैस) शिबिरे आयोजित करण्यात आलेले अपयश, परीक्षा वेळापत्रकांचे गैरव्यवस्थापन व शैक्षणकि नियोजनाचे उल्लंघन, विद्यापीठ परिनियमातील रजा नियमांचे उल्लंघन करणा:या प्राचार्यांवर कारवाई करण्यात अपयश आदींच्या विरोधासह सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी वेळापत्रक त्वरीत तयार करावे या मागणीसाठी प्राध्यापक धरणे आंदोलन छेडणार आहेत. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या बारा तासांचे दीर्घ धरणो आंदोलन प्राध्यापक छेडणार असल्याचे डॉ. परांजपे यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई