शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

निर्माता साजिद खानला क्लीन चिट? अभिनेता अरबाज खान, निर्माता पराग संघवी होणार साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:52 AM

सोनू जलान या बुकीशी फिल्म इंडस्ट्रीतील संपर्कातूनच ओळख झाली. त्याला मुंबई पोलिसांनी आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्यामुळे अटक केली होती.

ठाणे : सोनू जलान या बुकीशी फिल्म इंडस्ट्रीतील संपर्कातूनच ओळख झाली. त्याला मुंबई पोलिसांनी आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्यामुळे अटक केली होती. त्यानंतर त्याच्याशी संबंध तोडले असून आपण त्याच्याशी सट्टयावर कोणतीही भागीदारी केली नसल्याचा दावा करून चित्रपट निर्माता तथा दिग्दर्शक पराग संघवी यांनी बुधवारी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळल्याने त्याच्यासह अभिनेता अरबाज खान याला आता ठाणे पोलीस या प्रकरणात साक्षीदार करणार आहेत. तसेच सात वर्षांपूर्वी बेटिंग खेळल्यामुळे निर्माता साजिद खान यालाही पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे.पराग संघवी हे आपले भागीदार असल्याची माहिती कुख्यात सट्टेबाज सोनू जलान याने ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत दिली होती. याच पार्श्वभूमीवर त्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने आपल्यावरील हे आरोप फेटाळून सोनूशी गेल्या दीड वर्षापासून संबंध तोडल्याचा दावा केला.मुंबईतील जूहू येथील एका हॉटेलमध्ये पराग आणि सोनूची तीन ते चार वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणेही व्हायचे. साधारण, दीड वर्षांपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्याने सोनूला अटक केली होती. तेंव्हा सोनू एक मोठा बुकी असल्याची माहिती मिळाली, पण त्यानंतर आपण त्याच्याशी संबंध तोडले आहेत. त्याच्याशी आपली क्रिकेटवरील जुगाराची कोणतीही भागीदारी नसल्याचा दावा संघवी यांनी केला. संघवी यांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी केली जाणार असून त्यांचे व्यवहारही तपासले जाणार आहेत. गरज पडली तर संघवींना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाईल. चित्रपट अभिनेता अरबाज खानला या प्रकरणात साक्षीदार केले जाणार आहे. तसा जबाब भारतीय दंड संहितेच्या कलम १६४ नुसार न्यायालयासमोर नोंदविला जाणार आहे. अरबाज खान प्रमाणेच आता संघवींचाही जबाब १६४ नुसार नोंदविला जाणार असून त्यांनाही या प्रकरणात साक्षीदार केले जाणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.घटना सात वर्षांपूर्वीची...दिग्दर्शक, निर्माता साजिद खान याचेही नाव बेटिंगमध्ये सोनूने पोलिसांच्या चौकशीत घेतले. परंतु, हा प्रकार सात वर्षांपूर्वीचा असल्याने साजिद यांना चौकशीला बोलविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे प्रदीप शर्मा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा