भिवंडीतील खासगी कर वसुली ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:42 IST2020-12-22T19:42:43+5:302020-12-22T19:42:50+5:30
विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे. मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.

भिवंडीतील खासगी कर वसुली ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन
- नितिन पंडीत
भिवंडी ( दि २२ ) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे . विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहेत.
विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे. मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. यावेळी मनपा युक्त डॉ पंकज आशिया यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील मनपा आयुक्तांकडे दिले. या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड , प्रदीप राका, वसीम अन्सारी , फराज बाबा , जाकीर मिर्जा , सिद्धेश्वर कामूर्ती , जुबेर अंसारी , आरिफ खान , आबू सुफियान , अरुण राऊत , नासिर खान , मोहम्मद हुसेन , साद मोमीन, इरफान वायरमन , साजिद खान , राहुल पाटील , मुजाहिद अंसारी , साजिद अंसारी , अश्रफ मुन्ना आदी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान आंदोलनादरम्यान आपण मनपा युक्तांची भेट घेतली असता सदरचा ठराव अजून माझ्यापर्यंत मंजुरीसाठी आलेला नाही , सदर ठराव माझ्याकडे आल्यानंतर त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जातील जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मजुरी देणार नाहीत असे आश्वासन आम्हाला मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिले असून जो पर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक शोएब गुड्डू यांनी दिली आहे.