शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

ठाण्यातील खाजगी रुग्णालये महागडीच, कोरोना रुग्णासाठी रोजचा १२ हजार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 4:00 PM

महापालिका आयुक्तांनी खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेल्या लुटीच्या विरोधात खर्चाची नियमावली जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यानुसार अद्यापही खाजगी हॉस्पीटलकडून पालन होत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

ठाणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या मध्यवर्गीय रु ग्णांना माफक दरात उपचार मिळण्यासाठी महापालिकेने ठरविलेले दर ठाण्यातील खाजगी रु ग्णालयांनी फेटाळले आहेत. कोरोनाच्या रु ग्णाला दररोज किमान १२ हजार ५०० चा भूर्दंड बसत आहे. ९ ते १० पेशंट असलेल्या कक्षातील एका बेडचा ४ हजार ५०० रु पये चार्ज, ३६५० रु पयांचे पीपीई कीट व मास्क, २५०० डॉक्टर फी यांच्यासह औषधे व चाचण्यांसाठी दररोज १२ हजार ५०० रु पये आकारले जात आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला असून, महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे संबंधित रु ग्णालयांची चौकशी करु न कारवाईची मागणी केली आहे.            अमरावतीहून ठाण्यातील निवासस्थानी परतलेल्या एका ७१ वर्षांच्या वृद्धाची सतर्कता म्हणून नौपाडा येथील खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांना घाईघाईत घोडबंदर रोडवरील एका खाजगी रु ग्णालयात नेण्यात आले. ते मध्यमवर्गीय असल्यामुळे कुटुंबियांनी सामान्य कक्षाची मागणी केली होती. मात्र, कोरोनासाठी केवळ आयसीयू व एचडीयू युनिट आहेत. सामान्य कक्ष अस्तित्वात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना एचडीयू (हाय डिफेडन्सी यूनिट) कक्षात दाखल करण्यात आले. तेथील रु ममध्ये ९ ते १० रु ग्णांना ठेवण्यात आले असल्याचे रु ग्णाचे म्हणणे आहे. तेथे त्यांच्यावर ८ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. डिस्चार्जआधी त्यांनी पुन्हा कोरोना चाचणीचा आग्रह धरला. मात्र, त्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करीत तब्बल एक लाख एक हजार १३९ रु पयांचे बिल हाती सोपविण्यात आले. या बिलाने रु ग्णासह कुटुंबियांनाही धक्का बसला. स्पेशल वॉर्ड वा आयसीयूमध्ये दाखल नसतानाही, दररोज साडेबारा हजार रु पयांप्रमाणे बिल कसे आले, असा या रु ग्णाचा सवाल आहे. आपली कैफियत त्यांनी नगरसेवक नारायण पवार यांना सांगितली.त्यानुसार पवार यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना पत्रव्यवहार केला असून कारवाईची मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी अधिकचे पैसे घेणाऱ्या हॉस्पीटलसाठी नियमावली तयार केली आहे. परंतु त्याला पुर्ता हरताळ फासला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन घोडबंदर येथील संबंधित रु ग्णालयावर कारवाई करावी. तसेच सर्व खाजगी रु ग्णालयांमधील कारभाराची चौकशी करु न ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.एकाच पीपीई किटवर रु ग्ण तपासणीपीपीई कीटसाठी दररोज ३ हजार ६७५ रु पये आकारले गेले. मात्र, माझ्या परिचित रु ग्णाच्या मते कक्षातील ९ ते १० जणांची डॉक्टरांकडून एकाच फेरीत तपासणी होत होती. अशा परिस्थितीत प्रत्येक रु ग्णाकडून पीपीई कीटसाठी शुल्क कसे आकारले जाते, असा सवाल पवार यांनी केला. महापालिकेने सामान्य कक्षासाठी चार हजार रु पये दर निश्चित केल्याचीही संबंधित रु ग्णालयाला माहितीच नाही. तेथे केवळ आयसीयू व एचडीयू असे दोन कक्ष आहेत. महापालिकेचा कोणताही आदेश रु ग्णालयाकडे आला नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या