शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

खासगी डॉक्टरांनाही मिळणार ५० लाखांचे विमा संरक्षण, एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 06:45 IST

तसेच त्यांनाही ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री यांनी रविवारी दिली.

ठाणे : राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापालिका कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेची निर्मिती करत असताना मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी आयएमएच्या ठाणे शाखेच्या माध्यमातून ५० फिजिशिअन आणि ७ इन्टेन्सिव्हिस्ट सोमवारपासून सेवा देणार असून जनरल प्रॅक्टिशनर्सनीही आपले दवाखाने सुरू केल्यास सरकारी रुग्णालयांवर येणारा ताण कमी होईल. यासाठी त्यांच्यासह महापालिकेच्या कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन त्यांना कोरोनाची बाधा झाल्यास उपचारात काहीही कमी पडू दिले जाणार नाही. तसेच त्यांनाही ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री यांनी रविवारी दिली.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) ठाणे शाखेच्या माध्यमातून शिंदे यांनी वेबिनारद्वारे आयएमएचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी आणि एक हजारहून अधिक खासगी डॉक्टरांशी रविवारी संवाद साधला. या वेबिनारमध्ये कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे खजिनदार आणि आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकेर, आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, राज्य सरकारच्या कोरोना टास्ट फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ठाण्यातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. आनंद भावे, आयएमए, ठाणेचे मावळते अध्यक्ष डॉ. दिनकर देसाई, भावी अध्यक्ष डॉ. संतोष कदम, फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित, ईएनटी तज्ज्ञ डॉ. आशिष भुमकर, डॉ. रीटा भिडे, डॉ. लता घनशामानी, ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी मान्यवरांनी सहभागी होऊन आपली मते मांडली.मालेगाव मॉडेलमुळे मुंब्य्रात कोरोना आटोक्यातठाणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखतानाच मृत्यूदर कमी ठेवणे, याला सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी सर्व खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांनीही पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेबिनारमध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेने रेमडेसिविर, फॅबिफ्लू यांसारख्या अत्यावश्यक औषधांची खरेदी करण्याची सूचना केली. धारावी मॉडेलप्रमाणेच मालेगाव मॉडेलही प्रभावी ठरले असून त्याची अंमलबजावणी केल्यामुळे मुंब्रा-कौसा येथे रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेdocterडॉक्टरEknath Shindeएकनाथ शिंदे