शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुरावा नष्ट करण्यासाठी पुरलेले प्रेत पोलिसांनी काढले बाहेर, पत्नीचा खून करणा-या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 16:52 IST

व्यसनाधीन पतीने सतत मारहाण करून पत्नीला जीवेठार मारून तीचा मृतदेह घराजवळच पुरून पुरवा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली

भिवंडी - व्यसनाधीन पतीने सतत मारहाण करून पत्नीला जीवेठार मारून तीचा मृतदेह घराजवळच पुरून पुरवा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली असून पोलिसांनी दंडाधिकारी व पंचांच्या साक्षीने पुरलेले प्रेत बाहेर काढून काल रविवार रोजी रात्रीच्या वेळी शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे.रूग्णालयांत नेले आहे.लक्ष्मी वन्या कोरडे(२८)असे मयत महिलेचे नांव असुन ती पती वन्या जगन कोरडे(२८) सोबत तालुक्यातील काटई गावात दिवाणमाळ येथे रहात होती.वन्या कोरडे हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे.त्यामुळे त्यांच्या घरांत नेहमी कोणत्याही कारणाने भांडण होत होते.शुक्रवार रोजी रात्रीच्या वेळी दोघांमध्ये जोराचे भांडण होऊन वन्या याने दारूच्या नशेत लक्ष्मीला पोटात लाथा मारल्या तेंव्हा तीने वाचविण्यासाठी आरडाओरड केली.त्यामुळे शेजारील शोभा नरेश दभाले(३५)ही भांडण सोडविण्यास गेली असता तीला वन्या याने मारहाण करण्याची धमकी दिल्याने ती निघुन गेली.दुसºया दिवशी सकाळी शोभा ने लक्ष्मीची विचारपूस केली असता वन्याने ती विष पिऊन मेल्याचे सांगीतले.शनिवारी दिवसभर तीचा मृतदेह घरांत ठेऊन वन्या याने रात्रीच्या वेळी घरापासून २००मीटर अंतरावर तीन फुट खड्डा करून काही लोकांच्या मदतीने लक्ष्मीचा मृतदेह खड्ड्यात पुरला.या घटनेची माहिती शेजारील लोकांनी लक्ष्मीच्या आईला दिली असता ती जव्हारहून आली आणि वन्याला जाब विचारला तेंव्हा त्याने विष पिऊन मेल्याचे सांगीतले.ही घटना निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना समजल्यावर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली.काल रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास नायब तहसिलदार संदिप आवारी,वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कोते व इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयांतील वैद्यकीय पथकाच्या साक्षीने लक्ष्मी कोरडे हिचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रूग्णालयांत पाठविण्यात आला आहे.या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी गुन्हा दाखल करून वन्या जगन कोरडे यांस अटक केली आहे.(प्रतिनिधी) (सोबत फोटो आहे.)------------------------------------------------------- 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाBhiwandiभिवंडी