ठाण्यातील कैदी होणार आता उच्चशिक्षित
By Admin | Updated: September 1, 2016 03:06 IST2016-09-01T03:06:25+5:302016-09-01T03:06:51+5:30
विदर्भातील कारागृहाच्या धर्तीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून

ठाण्यातील कैदी होणार आता उच्चशिक्षित
पंकज रोडेकर, ठाणे
विदर्भातील कारागृहाच्या धर्तीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून यावर्षीपासूनच एम. ए या शैक्षणिक उपक्रमाचा श्रीगणेशा केल्याने येथील कैद्यांना उच्चशिक्षित होता येणार आहे.
यासंदर्भात दिल्ली विद्यापीठात सादर केलेल्या प्रस्तावात ठाणे जेलमधून ४ जण एम. ए आणि ४२ जण त्या अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारी परीक्षेस बसले आहेत. विशेष म्हणजे ही परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषातून घेतली जाणार आहे. ज्ञान हे कोणत्याही वर्षी आणि कोणीही आत्मसाथ करून शकतो. अशाप्रकारे ते संपादनाची तयारी असणाऱ्या ठाणे जेलमधील (कच्च्या) बंदीवान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. मात्र, हे शिक्षण मराठीत बी.ए पर्यंत घेता येते. त्यामुळे बी.ए झाल्यावर एम.ए व्हावे असे वाटणाऱ्यांना पुढे त्यास बसता येत नव्हते. मागील वर्षी ५ बंदी बीए परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
याचदरम्यान, फेब्रुवारीत ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक म्हणून रुजू झालेले हिरालाल जाधव यांनी बी. ए. उत्तीर्ण होणाऱ्या बंदीवानांना येथेच उच्च शिक्षण घेता यावे, म्हणून विदर्भातील कारागृहाच्या धर्तीवर एम. ए हा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, कारागृह अधिकारी गणेश मुटकुळे यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगून तो दिल्लीतील इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ येथे सादर केला.
या प्रस्तावात गेल्यावर्षी बी.ए. झालेले ४ जण तर ४२ जणांनी याच्या पूर्व परीक्षा देण्याची तयारी
दाखवली आहे. ही परीक्षा यशवंतराव विद्यापीठाप्रमाणे घेतली जाणार
आहे.
गतवर्षी २०१५-१६ या वर्षी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून एफवायबीए या वर्षासाठी ४४ जण, एसवायबीएला ०७ आणि टीवायबीएला ०५ जण बसले होते. तर यावर्षी एफवायबीएला ०२, एसवायबीएला १७ आणि टीवायबीएला ०४ जण बसले आहेत.
गतवर्षी परीक्षेला बसलेले सर्व बंदीवान उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेले आहेत. या परीक्षेस बसलेले सर्व बंदीवानांना शिक्षा झालेली नाही. त्यामध्ये काही कच्चेही बंदीवान असल्याने हा आकडा यंदा कमी दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.