चाकूहल्ला करणाऱ्यास तुरुंगवास
By Admin | Updated: July 6, 2016 01:52 IST2016-07-06T01:52:49+5:302016-07-06T01:52:49+5:30
चाकूने हल्ला करणाऱ्या सलीम शेखला उल्हासनगर कनिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. तर या गुन्ह्यातील अन्य दोघांची

चाकूहल्ला करणाऱ्यास तुरुंगवास
ठाणे : चाकूने हल्ला करणाऱ्या सलीम शेखला उल्हासनगर कनिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. तर या गुन्ह्यातील अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, त्यांच्याविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.
हा निकाल तब्बल १२ वर्षांनी लागला. अबंरनाथ येथे राहणारे असरार खान यांच्यावर परिसरात राहणाऱ्या सलीम शेखने २२ आॅगस्ट २००५ रोजी चाकूने हल्ला करून गंभीर दुखापती केली होती. लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या भांडणातून त्या दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद झाला होता. यातूनच सलीमने असरार याला धक्का मारून शिवीगाळ केली. याचाच जबाब असरार याने विचारताच, सलीम अन्य दोघांनी असरार याच्या घरात घुसून त्याच्या आई-वडिलांना मारहाण केली. याचदरम्यान, असरार याने पोलीस ठाण्यात तक्रार देतो असे म्हणताच, सलीमने चाकूने हल्ला चढविला. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने सलीमला दोषी ठरवून विविध गुन्ह्यात वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)