ठाणे : देशभरात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार २३ सप्टेंबर रोजी होईल. याच दिवशीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार परडणाऱ्या या योजनेच्या शुभारंभ जावडेकर यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेही उपस्थित असतील. दुपारी १२ वाजता प्रारंभ होणा-या या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येतील, असे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. या योजनेचा लाभ जिल्हह्यातील साडे तीन लाख कुटुंबाना होणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३ तर शहरी भागातील दोन लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभ होईल, असे योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण मोटे यांनी सांगितले. दिली.राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे. यासाठी निकषास अनुसरून निवडलेल्या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रूपये विमा संरक्षण राहील. या योजनेंतर्गत त्या कुटुंबाना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रूग्णालयात उपचार घेता येईल. या योजनेमध्ये सुमारे एक हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रु ग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रूग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. जिल्ह्यात सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रु ग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच उल्हासनगर येथील रु ग्णालये संलग्नित करण्यात आले आहेत.* यांना मिळणार लाभआयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती - जमातीचे दारिद्रय रेषेखालील कुटुंब , भूमिहीन , दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीचे कच्चे घरात राहणारे, महिला कुटुंब प्रमुख असलेले, यांचा या योजनेत सहभाग आहे. तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्र ी करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी,वेल्डर, गटईकामगार, फेरीवाले, सफाईकामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक , वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरु स्ती करणारे, धोबी आणि चौकीदार आदींच्या कुटुंबांना या योजनेत पात्र ठरवण्यात आले आहे.कोण पात्र आहेत
मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 19:04 IST
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार परडणाऱ्या या योजनेच्या शुभारंभ जावडेकर यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेही उपस्थित असतील. दुपारी १२ वाजता प्रारंभ होणा-या या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येतील
मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात रविवारी शुभारंभ
ठळक मुद्दे* पाच कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरूपात हेल्थ कार्डसचे वाटपठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३ तर शहरी भागातील दोन लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभनिवडलेल्या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रूपये विमा संरक्षणया योजनेमध्ये सुमारे एक हजार १२२ आजारांचा समावेश