शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रदुषण रोखा: डोंबिवलीच्या सायकल मित्र संमेलनाला १ हजार सायकपटूंची रॅली

By अनिकेत घमंडी | Updated: January 9, 2018 16:46 IST

डोंबिवली: सायकल मित्र संमेलनात १ हजार सायकलपटू डोंबिवली शहराच्या विविध भागातून सायकल चालवत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख पाच - सहा ठिकाणांहून २०० सायकलपटू एकाच वेळी सायकल चालवणार आहेत.२८ जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली निघणार असून साधारणत: सात-साडेसात वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहानजीक सगळया सायकलप्रेमींचे एकत्रिकरण होणार आहे. ...

ठळक मुद्दे २८ जानेवारी रोजी सायकल धावणार  १४ जानेवारी रोजी रॅलीची होणार रंगित तालिम

डोंबिवली: सायकल मित्र संमेलनात १ हजार सायकलपटू डोंबिवली शहराच्या विविध भागातून सायकल चालवत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख पाच - सहा ठिकाणांहून २०० सायकलपटू एकाच वेळी सायकल चालवणार आहेत.२८ जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली निघणार असून साधारणत: सात-साडेसात वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहानजीक सगळया सायकलप्रेमींचे एकत्रिकरण होणार आहे. त्यानंतर सायकल रॅलीचा समारोप होणार अल्पावधीनंतर न्याहारीचा उपक्रम असेल आणि त्यानंतर तातडीने संमेलनाला सकाळी ८.३० ते ९ वाजता वेळेत शुभारंभ करण्याचा आयोजकांचा मानस आहे. क्रिडा भारती, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन आणि डोंबिवली सायकल क्बल या शिखर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सायकल मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.संमेलनाचे आयोजक कमलाकर क्षिरसागर, डॉ. सुनिल पुणतांबेकर आणि अन्य सहकार्यांनी सायकल रॅलीची माहिती दिली. त्या रॅलीत संभाव्या अडचणी अथवा नियोजन कसे करावे लागेल याची रंगित तालीम घेण्यासाठी रविवारी १४ जानेवारी रोजी शहरातील प्रमुख पाच ठिकाणांहून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी फडके रोड गणेश मंदिर, गणेश मंंदिर मिलापनगर,एमआयडीसी, रेतीबंदर चौक-डोंबिवली पश्चिम, अग्नीशमन दल-महात्मा फुले रोड-डोंबिवली पश्चिम, आणि श्री स्वामी समर्थ मठ नांदिवली आदी ठिकाणांहून सकाळी ७ वाजता सायकलपटू सायकल रॅलीची रंगित तालीम करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक ठिकाणाहून संमेलन आयोजकांनी चार स्वयंसेवकांची फळी तयार केली असून ते स्वयंसेवक रॅलीसोबत राहतील. पूर्वेच्या पारसमणी चौकात सगळयांचे एकत्रिकरण होणार असून त्यानंतर शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयासमोर सगळे जातील, तेथे समारोप होईल. सगळयांचे एकत्रिकरण होईल, वेळ किती लागतो,अडचणी काय येऊ शकतात, तसेच अन्य तांत्रिक बाबींवर चर्चा झाल्यावर या रॅलीची सांगता होणार आहे.त्यानूसार २८ जानेवारी रोजी होणा-या रॅलीचे नियोजन करणे सोपे जाणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. प्रदुषण टाळण्यासाठी सायकल रॅली, सायकल चालवा आरोग्य राखा हा मुख्य उद्देश असून त्या घोषवाक्याखाली ही रॅली निघेल असेही सांगण्यात आले. १४जानेवारी रोजी होणा-या सायकल रॅलीला डोंबिवलीसह परिसरातील सायकलपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहक करण्यात आले आहे. तसेच २८ जानेवारी रोजी वयवर्षे १२ ते पुढील सायकपटूंना प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होता येणार आहे. तर त्या खालील वयोगटातील मुलांना थेट संमेलनस्थळी पालकांसमवेत येऊन त्या रॅलीच्या समारोपाचा आनंद लुटावा, एकत्र यावे, सायकल विषयक माहिती, आकर्षण वाढवावे, जनजागृती करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीVinod Tawdeविनोद तावडेNarendra Modiनरेंद्र मोदी