बतावणी करीत लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST2021-07-03T04:25:20+5:302021-07-03T04:25:20+5:30
--------------------------------------- दुचाकी चोरीला डोंबिवली : पूर्वेतील खंबाळपाडा रोडवरील लक्ष्मी पार्क बिल्डिंगसमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री ...

बतावणी करीत लुबाडणूक
---------------------------------------
दुचाकी चोरीला
डोंबिवली : पूर्वेतील खंबाळपाडा रोडवरील लक्ष्मी पार्क बिल्डिंगसमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी दुचाकीधारक विक्रमसिंग परिहर याने टिळकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
---------------------------------------
घरफोडीत ५१ हजारांचे दागिने लंपास
डोंबिवली : पूर्वेतील आजदेगाव परिसरातील सार्थक पार्क बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शर्मिला वाव्हळ यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ५१ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी दुपारी ३.१५ ते ४.३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी वाव्हळ यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-------------------------------------------
६९ हजारांचे दागिने चोरले
डोंबिवली : अनिता दिघे या २१ जूनला सकाळी ९.३० वाजता लोढा हेवन परिसरातील लोढा मेमोरियल हायस्कूल इमारतीच्या समोरील पदपथावर बसून पूजेचे साहित्य विकत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाचा कोट परिधान केलेली व मास्क लावलेली व्यक्ती तेथे आली. त्याने नारळ, कापूर व अगरबत्ती खरेदी केली. यावेळी त्याने अनिता यांना साहित्यातील वस्तूंना गळ्यातील सोन्याची माळ आणि अंगठीचा स्पर्श करण्यास सांगितले असता संबंधित सोन्याचे दागिने त्याने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसात अनिता यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पास सुरू केला आहे.
----------------------------------------------
दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूचे वार
डोंबिवली : दारू पिण्यास पैसे मागितले असता ते न दिल्याने मारहाण करीत चाकूने वार करणाऱ्या अभिषेक गुप्ता याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात राहुल मयेकर हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी पूर्वेतील समतानगर येथील एस. के. फोटो स्टुडिओ, आदर्श किराणा स्टोअर्सजवळ घडली. याप्रकरणी गुप्तावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------