शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गडकरी कट्ट्यावर पत्रकार परिषदांना बंदी; महापालिकेचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:11 IST

महापालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा

ठाणे : ठाणे महापालिकेची वास्तू असलेल्या गडकरी रंगायतनमध्ये मागील कित्येक वर्षांपासून येथील कट्ट्यावर विविध स्वरूपाच्या पत्रकार परिषदा घेतल्या जात होत्या. मात्र, आता महापालिकेची बदनामी होईल, अशा पत्रकार परिषदा घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्रकच महापालिकेच्या आस्थापना विभागाने गडकरी कट्टा उपाहारगृहाला दिले आहे.गडकरी कट्टा हा पत्रकार परिषदांना नेहमी मोक्याचे ठिकाण समजले जात होते. कित्येक वर्षांपासून येथे महापालिकेच्या विरोधातील विषय असो किंवा इतर कोणत्याही विषयावर या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या जात होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच पालिकेने फतवा काढला असून गडकरी कट्टा पत्रकार परिषदेसाठी उपलब्ध करून देण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे.पालिकेने त्याचे कारण आता स्पष्ट केले आहे, त्यानुसार गडकरी रंगायतन ही महापालिकेची वास्तू आहे. त्यामुळे येथे अनेकदा पालिकेविरोधात किंवा प्रशासनावर टीका करणाऱ्या पत्रकार परिषदा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळेच यापुढे अशा पत्रकार परिषदांना परवानगी देऊ नये, असे आस्थापना विभागाने गडकरी कट्टा उपाहारगृहाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.विशेष म्हणजे कमी खर्चात हे उपाहारगृह उपलब्ध होत होते. परंतु, काही महिन्यांपासून महापालिकेविरोधात टीका सुरू आहे. तसेच पालिकेचे काही प्रकल्प, क्लस्टर आदींसह इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांवरून पालिकेवर टीकाही केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे मतदाता जागरण अभियान तेथे क्लस्टरविरोधात पत्रकार परिषद घेणार होते. परंतु, त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका