जिल्हा बँकांच्या अध्यक्षांचे आज पंतप्रधानांना साकडे

By Admin | Updated: November 18, 2016 06:19 IST2016-11-18T06:19:13+5:302016-11-18T06:19:13+5:30

राज्यातील ३१ जिल्हा बँकांना पाचशे, हजार रुपयांच्या नोटा घेण्यास मागील

The President of the District Banks today met the Prime Minister | जिल्हा बँकांच्या अध्यक्षांचे आज पंतप्रधानांना साकडे

जिल्हा बँकांच्या अध्यक्षांचे आज पंतप्रधानांना साकडे

ठाणे : राज्यातील ३१ जिल्हा बँकांना पाचशे, हजार रुपयांच्या नोटा घेण्यास मागील तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्हा बँक अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट घेणार असल्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी सांगितले. राज्यातील सर्व जिल्हा बँक अध्यक्षांनी बँक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नोटबंदीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. बंदी घातल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबलेला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The President of the District Banks today met the Prime Minister