डोंबिवलीत पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST2021-06-06T04:29:44+5:302021-06-06T04:29:44+5:30
डोंबिवली : चार दिवसांपूर्वी पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार हजेरी लावलेली होती. तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ असतानाच शनिवारी दुपारी पावसाने ...

डोंबिवलीत पावसाची हजेरी
डोंबिवली : चार दिवसांपूर्वी पावसाने वादळीवाऱ्यासह जोरदार हजेरी लावलेली होती. तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ असतानाच शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. अधूनमधून ढगांचा गडगडाटही होत होता.
शनिवार, रविवार लॉकडाऊन असल्याने भरपूर दुकाने सुरू होती. त्यात दुपारी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाली; पण गर्दी नसल्याने कुठेही गैरसोय मात्र झाली नाही. पावसामुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला. आधीच व्यवसाय नसल्याने आणि पाऊस आल्याने घराबाहेर येण्याचे नागरिकांनी टाळले. कडक निर्बंध काळात रिक्षाचा व्यवसाय जेवढा होतो तेवढाही झाला नसल्याचे सांगण्यात आले. लोकल सेवेवर पावसाचा कोणताही परिणाम झाला नव्हता. पावसामुळे शहरात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारनंतर भाजीबाजार बंद असल्याने तेथेही फारशी गर्दी नव्हती. फडके रस्त्यावर तुलनेने शुकशुकाट जाणवत होता.