शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी सफाई कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात; प्रभाग २३ मधील भाजपा नगरसेविकेच्या त्रासाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 17:57 IST

बदनामीची धमकी देणाऱ्या भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांच्या त्रासाला कंटाळून कामगार कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग २३ मध्ये सफाई काम करणा-या कंत्राटी कामगारांना सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देणाऱ्या भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांच्या त्रासाला कंटाळून कामगार कामबंद आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले आहे.म्हात्रे या प्रभागातील कंत्राटी सफाई कामगारांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करतात. त्यांना मारहाणीची धमकी देत विश्रांतीच्या वेळेतही जबरदस्ती काम करण्यास सांगतात. त्याचा कहर म्हणजे एका स्थानिक मुकादमला व कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला चारित्र्यहननची बदनामीकारक धमकी देतात. कामाला नकार देणाऱ्या कामगारांची खोटी तक्रार प्रशासनाकडे करून कामगारांची बदली करणे वा त्यांना कामावरुन कमी करण्याचा प्रकार करीत असल्याने म्हात्रे यांच्याविरोधात भार्इंदर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले.पालिकेतील कंत्राटी सफाई कामगार संघटनेचे सदस्य असल्याने संघटनेने आ. नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता व आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे देखील म्हात्रे यांच्याविरोधात लेखी तक्रार करुन दाद मागितली. यानंतरही म्हात्रे यांचा उपद्रव वाढला असून, तक्रारीचा राग मनात ठेवून त्यांनी कामगारांना आणखी त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप संघटनेचे पदाधिकारी मंगेश पाटील यांनी केला आहे.म्हात्रे यांचा वाढत्या त्रासाला तसेच बदनामी करण्याच्या धमकीची दखल कोणीही न घेतल्यानेच कामगारांनी अखेर संघटनेच्या माध्यमातून कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले कि, स्थानिक नगरसेविका नयना म्हात्रे यांनी कामगारांना नाहक त्रास देणे योग्य नाही. कामगारांच्या कामाच्या बाबतीत तक्रारी असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्याऐवजी कामगारांना स्वत:च शिवीगाळ करून धमकी देणे कोणत्याही लोकप्रतिनिधींना अशोभनीय आहे. याप्रकरणी कामगारांनी वरीष्ठ लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे दाद मागितली आहे. त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच कामबंद आंदोलन छेडण्यात येईल. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या त्रासामुळे कामगारांवर आंदोलन छेडण्याची ही पहिलीच वेळ ठरणार असली तरी भाजपच्या अच्छे दिनात कामगारांना भाजपचेच लोकप्रतिनिधी बुरे दिन दाखवित असल्याचे खेदाने म्हणावेसे वाटत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक