शहापुरात आगरी महोत्सवाची तयारी जोरात

By Admin | Updated: February 8, 2017 04:04 IST2017-02-08T04:04:34+5:302017-02-08T04:04:34+5:30

आगरी क्र ांती सामिजक प्रतिष्ठानतर्फे येत्या १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान शहापुरात आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Preparations for the Agri festival at Shahpura | शहापुरात आगरी महोत्सवाची तयारी जोरात

शहापुरात आगरी महोत्सवाची तयारी जोरात

शहापूर : आगरी क्र ांती सामिजक प्रतिष्ठानतर्फे येत्या १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान शहापुरात आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या अंतिम टप्प्यात आलेल्या या महोत्सवाच्या तयारीसाठी समाजातील कार्यकर्त्यांची लगबग सुरु आहे.
विखुरलेला आगरी समाज एकत्र करून सामाजिक एकोपा जपणे, हा या आगरी आगरी महोत्सवाचा प्रमुख हेतू असल्याचे महोत्सवाचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी सांगितले. महोत्सवाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, समाजहितासाठी सामुदायिक विवाह सोहोळे राबवणे, संस्कृती, रूढी, परंपरा जोपासणे, याही अनेक गोष्टी यामुळे साध्य होणार असल्याचेही ते म्हणाले.
गुजराथी नगरातील मोकळ्या मैदानात आगरी महोत्सवाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. कमानी आणि मंडपाची उभारणी, स्टेज आणि आसनव्यवस्था, प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज आणि शौचालयाची सोय, पार्र्किंगची व्यवस्था याकडे महोत्सवाचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी हे जातीने लक्ष देत आहेत. यासाठी दोनशे हून अधिक स्टॉल उभारण्यात आले असून हे स्टॉल मिळविण्यासाठी इच्छुकांची गर्दी होत आहे. खाद्य पदार्थांपासून ते इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच बँकापासून विविध सेवांच्या माहितीचे स्टॉल येथे असतील.
या महोत्सवासाठी ठाणे, रायगड, मुंबई, नाशिक, पुणे रत्नागिरी येथून आगरी समाज उपस्थित राहणार असून या महोत्सवात सामुदायिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय अनेक सांस्कृतिक आणि मनोरजनात्मक कार्यक्र मांची रेलचेल या महोत्सवात असणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Preparations for the Agri festival at Shahpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.