शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त

By जितेंद्र कालेकर | Updated: January 25, 2019 22:07 IST

अतिरेकी संघटनांनी देशात घातपाती कारवाया करण्याचा दिलेला इशारा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देअतिदक्षतेचा पोलीस ठाण्यांना इशाराहॉटेल आणि मोक्याच्या ठिकाणी होणार तपासणीसीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही टेहळणी

ठाणे : मुंबई आणि औरंगाबाद ही दोन शहरे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती ‘इसिस’ संशयित नऊ तरुणांच्या धरपकडीनंतर उघड झाली. तसेच देशात घातपाती कारवायांचा काही अतिरेकी संघटनांनी इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिली.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या परिमंडळांमधील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच ठाणे ग्रामीणच्या परिसरातील सागरी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात खास टेहळणी आणि गस्ती पथके तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यात पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त अविनाश अंबुरे तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मोक्याच्या ठिकाणांसह मुंब्रा, भिवंडी, राबोडी, कल्याण आणि ठाणे शहर तसेच मीरा रोड आणि भार्इंदर अशा संवेदनशील ठिकाणी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून सुरक्षा व्यवस्थेमध्येही वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, लॉजेस आणि ढाब्यांची तपासणी करण्यात येत आहे. शहरात येणा-या आणि जाणा-या मार्गांवरही नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. मार्केट, मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या कार्यक्रमांच्या ठिकाणी जलद प्रतिसाद दल, श्वानपथक, बीडीडीएसची पथकं गस्त घालत आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमे-यांद्वारेही संवेदनशील ठिकाणांवर लक्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागरिकांनीदेखील भीती न बाळगता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच संशयास्पद वस्तूला हात लावू नये. एखादी व्यक्ती अथवा वस्तू संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मॉल, मार्केट आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच चौकाचौकांमध्ये तपासणीही करण्यात येत आहे. हॉटेल, लॉज तसेच संशयास्पद ठिकाणीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असून संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे.

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस