उल्हासनगरमध्ये प्रचाराची रणधुमाळी
By Admin | Updated: February 9, 2017 03:57 IST2017-02-09T03:57:13+5:302017-02-09T03:57:13+5:30
शिवसेना, भाजपा-ओमी टीम, साई पक्षासह इतर लहानमोठ्या पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली आहे. सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी घरोघरी जाऊन

उल्हासनगरमध्ये प्रचाराची रणधुमाळी
उल्हासनगर : शिवसेना, भाजपा-ओमी टीम, साई पक्षासह इतर लहानमोठ्या पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली आहे. सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारराजाची भेट घेणे सुरू केले असून प्रभागनिहाय रॅलीवर भर दिला आहे.
उल्हासनगर पूर्वेत शिवसेनेचे नगरसेवक रमेश चव्हाण, सुरेश जाधव, विजय ठाकूर, शेखर यादव, अरुण आशान भाजपाचे राजा गेमनानी, नरेंद्र राजानी, नितीन बोबडे, मीना सोंडे, काँग्रेसच्या अंजली साळवे, जया साधवानी, राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री यांनी प्रचाराचा नारळ फोडला. उमेदवार सकाळी ९ वाजता मतदारांच्या दारात कार्यकर्त्यांसह उभे राहत असून मत देण्याची विनंती करीत आहेत. शिवसेना प्रचाराची जबाबदारी आमदार बालाजी किणीकर, कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी, तर भाजपाचे राजा गेमनानी यांच्याकडे आहे. इतर पक्षांचे उमेदवार स्वत: प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहे.
शहर पश्चिममधून भाजपाच्या प्रचाराची जबाबदारी कुमार आयलानी, ओमी कलानी यांच्यावर आहे. भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार आयलानी, तर भाजपातील टीमच्या सदस्याचा प्रचार ओमी कलानी स्वत: करत आहेत.
साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी कॅम्पनिहाय प्रचार पथकाची स्थापना केली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भारिप, रिपाइं पक्षांचा प्रचार सद्य:स्थितीत उमेदवार कार्यकर्त्यांना घेऊन करत आहेत. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हे मिळताच त्यांनीही प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र शहरात आहे. (प्रतिनिधी)