मीरा-भार्इंदरमध्ये निवडणूकपूर्व जोरबैठका

By Admin | Updated: April 24, 2017 02:19 IST2017-04-24T02:19:45+5:302017-04-24T02:19:45+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून २७ एप्रिलला प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. आॅगस्टमध्ये

Pre-election rally in Mira-Bharindar | मीरा-भार्इंदरमध्ये निवडणूकपूर्व जोरबैठका

मीरा-भार्इंदरमध्ये निवडणूकपूर्व जोरबैठका

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून २७ एप्रिलला प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. आॅगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा अंदाज बांधून शहरात निवडणूकपूर्व राजकीय बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यात स्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील मतांच्या प्राबल्याचा व इतर प्रभागांत पक्षाच्या प्रभावाचा आढावा घेतला जात आहे.
यंदाची पालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपामध्ये होणार, असे संकेत मिळत आहे. परंतु, या दोन्ही पक्षांची युती झाल्यास युती नको असणाऱ्यांच्या इच्छेवर पाणी फिरणार आहे. युतीची कमी शक्यता लक्षात घेऊन दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयारी करत आहेत. नगरसेवकांसह पक्षात नुकताच प्रवेश घेतलेल्या इतर पक्षांतील विद्यमान नगरसेवकांच्या अस्तित्वातील प्रभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
दोन्ही पक्षांतील स्थानिक नेतृत्व एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. शिवसेनेतील वाढत्या इनकमिंगमुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे. त्यातच, शिवसेनेने जाणता राजा या महानाट्याचे दोन भाषांत प्रयोग ठेवल्याने इतर पक्षांतील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सर्व मराठी व अमराठी मतदारांना कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा कार्यक्रम काँग्रेसने राबवण्यास सुरुवात केली असली, तरी भाजपानेही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत कार्यक्रमांची मेजवानी देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने सध्याच्या १५ नगरसेवकांच्या आकडेवारीत कोणत्याही परिस्थितीत वाढ करण्याचा संकल्प सोडला असला, तरी युतीखेरीज भाजपा पैकीच्या पैकी जागा आणण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावी नेतृत्वाअभावी बाहेर फेकली गेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pre-election rally in Mira-Bharindar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.