भिवंडीत प्रवीण दरेकरांच्या पोस्टरला राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:36+5:302021-09-17T04:47:36+5:30
भिवंडी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सार्वजनिक सभेत महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. ...

भिवंडीत प्रवीण दरेकरांच्या पोस्टरला राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन
भिवंडी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सार्वजनिक सभेत महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. प्रवीण दरेकर यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रवीण दरेकरांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.
शहरातील स्व.आनंद दिघे चौक येथे एकत्रित झालेल्या महिलांनी बॅनरवर स्त्री वेशातील प्रवीण दरेकरांचा फोटो लावून प्रवीणा मावशी असा उपरोधिक उल्लेख करीत त्यास लिपस्टिक लावली व त्यानंतर हे पोस्टर जाळून प्रवीण दरेकरांचा निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.