शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 02:37 IST

सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनास मंजुरी दिल्याने आगरी भवनवरून अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मदतीला आयुक्त धावले आहेत.

मीरा रोड - सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनास मंजुरी दिल्याने आगरी भवनवरून अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मदतीला आयुक्त धावले आहेत. सरकारी पत्राच्या एका ओळीचा फक्त खेळाच्या मैदानाची १५ टक्के जागा मंजूर झाल्याचा सोयीचा अर्थ काढल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन बाळासाहेब कलादालनाच्या कामात आडकाठी करू नका, असे खडसावले. आरक्षण क्र. २४६ मध्ये आगरी भवन उभारण्यासाठी आपण ७५ लाखांचा निधी जाहीर केला असून तसा प्रस्ताव तयार करा, अशी तंबी दिली. सामाजिक वनीकरणाचे शहरातील एकमेव आरक्षण असल्याची माहितीच पालिकेने सरकारपासून लपवून ठेवली.भार्इंदर पूर्वेच्या आझादनगरजवळील आरक्षण क्र. १२२ या सामाजिक वनीकरण व खेळाच्या मैदानातील दोन एकर जागा आगरी भवनासाठी देण्याचा ठराव २०११ मध्ये महासभेने केला असता २०१४ मध्ये सरकारने तो फेटाळला होता. त्यानंतर, २०१६ मध्ये भाजपा व सेना युतीनेच या आरक्षणाच्या १५ टक्के जागेत बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाचा ठराव केला होता.मात्र, भाजपाने एकहाती सत्ता मिळवताच फेब्रुवारीमध्ये त्याच आरक्षणातील सहा हजार चौरस मीटर क्षेत्र वगळून ती जागा आगरी भवनसाठी देण्याचा ठराव बहुमताने केला. नगरविकास विभागानेच पालिकेच्या ताब्यात असलेल्या खेळाच्या मैदानातील मोकळ्या जागेवर कलादालन व सांस्कृतिक भवनचे बांधकाम करण्यास मंजुरी दिली. सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान असे सुमारे साडेचार हेक्टरचे आरक्षण असून त्याची विभागणी नाही. तसेच येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही झाले आहे.सामाजिक वनीकरणासाठी एकमेव आरक्षण असून औद्योगिक वसाहती, निवासी संकुलांच्या तुलनेत येथे झाडेच नाहीत. त्यामुळे मध्यवर्ती भागात हे आरक्षण महत्त्वाचे असताना महापालिका आयुक्त मात्र याकडे डोळेझाक करत आहे. सरकारी पत्रानुसार आगरी भवनचा विषय बारगळण्याची चिन्हे दिसल्याने समाजात नाराजी पसरल्याने भाजपाची धावपळ सुरू झाली आहे. आयुक्त बालाजी खतगावकर सत्ताधाऱ्यांच्या मदतीला धावले असून त्यांनी फक्त खेळाच्या मैदानाच्या जागेतील १५ टक्के बांधकामास मंजुरी दिल्याचा अर्थ काढून सामाजिक वनीकरणाच्या जागेत आगरी भवन बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिल्याचे समजते. आयुक्तांनी नुकतीच संबंधित अधिकाºयांची बैैठकही घेतली होती.बाळासाहेबांच्या स्मारकाआड येऊ नका, असे खडसावतानाच शिवसेना व काँग्रेसने सेव्हन स्क्वेअर शाळेमागील आरक्षण क्र. २४६ मधील १५ टक्के जागेत आगरी भवन उभारण्याचा ठराव केला होता. आगरी भवनासाठी आमदार निधीतून ५० लाख, तर व्यक्तिगत २५ लाख रुपये आपण जाहीर केले असून त्याचा प्रस्ताव तयार करा, असे सरनाईक यांनी सांगितले.दरम्यान, यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये राजकारण रंगणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.सामाजिक वनीकरणाच्या आरक्षणाची सरकारला कल्पनाआयुक्त बालाजी खतगावकर यांनी मात्र सामाजिक वनीकरणाच्या एकमेव आरक्षणाची सरकारला माहिती असून त्याबद्दल सरकार ठरवेल.या आरक्षणात एका बाजूला बाळासाहेब कलादालन, तर दुसºया बाजूला आगरी भवन बांधण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या