प्रांजल पाटीलवर अमेरिकेत होणार उपचार

By Admin | Updated: June 1, 2016 02:27 IST2016-06-01T02:27:50+5:302016-06-01T02:27:50+5:30

माझ्या रेटिनात दोष असल्यामुळे कुणी जीवंत किंवा मृत व्यक्तीने मला नेत्रदान केले तरीही मला त्याचा लाभ होणार नाही. रेटिनाच्या दोषामुळे

Pranjal Patil will take treatment in America | प्रांजल पाटीलवर अमेरिकेत होणार उपचार

प्रांजल पाटीलवर अमेरिकेत होणार उपचार

सदानंद नाईक, उल्हासनगर
माझ्या रेटिनात दोष असल्यामुळे कुणी जीवंत किंवा मृत व्यक्तीने मला नेत्रदान केले तरीही मला त्याचा लाभ होणार नाही. रेटिनाच्या दोषामुळे दृष्टीहीन असलेल्यांना दृष्टी लाभावी यावर अमेरिकेत संशोधन सुरु असून ते उपचार करून घेण्याकरिता आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असे अंधत्वावर मात करीत यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या प्रांजली पाटील हिने सांगितले.
कोलकाता येथील समरकुमार दत्ता बक्षी यांनी जीवंतपणी प्रांजलला आपला एक डोळा बहाल करण्याची तयारी दाखवली होती. ६६ वर्षीय समरकुमार यांनी म्हटले आहे की, माझे आता फारसे आयुष्य राहिलेले नाही. त्यामुळे माझा एक डोळा मी प्रांजलला द्यायला तयार आहे.’
समरकुमार यांच्या भावना कानावर आल्याने मी गहिवरले, असे सांगून प्रांजल म्हणाली की, दादर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. नटराजन यांच्याकडे माझी लहानपणापासून तपासणी सुरू आहे. हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पिटल येथेही उपचार झाले आहेत. मात्र डोळयामागील पडदा निकामी झाल्याने अन्य व्यक्तीचा डोळा बसवल्याने मला दृष्टी येणार नाही. रेटिनाच्या दोषावर अमेरिकेत संशोधन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्या संस्थेच्या संपर्कात आम्ही आहोत. त्या उपचारांनी पुन्हा दृष्टी येण्याची आशा आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील चाळीत राहणारी प्रांजल लहेनसिंग पाटील लहानपणापासूनच हुशार होती. वयाच्या १२व्या वर्षानंतर प्रांजलला अधंत्व येणार असल्याची कल्पना डॉक्टरांनी पाटील कुटुंबाला दिली होती. अंधत्व आल्यावर तिचे कसे होणार? ती स्वत:च्या पायावर कशी उभी राहणार? अशी चिंता आई-वडीलांना भेडसावत होती. मात्र अंधत्वावर मात करीत प्रांजलने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली.

Web Title: Pranjal Patil will take treatment in America