शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

मीरा रोडमधील प्राणिमित्र महिलेस तक्रारीनंतर घर करावे लागले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 04:03 IST

Mira Road News : भटके श्वान व मांजरांची सेवा करणाऱ्या शांतीनगर सेक्टर एकमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्राणिमित्र महिलेस गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारीनंतर घर रिकामे करावे लागत असल्याचा प्रकार घडला आहे.

मीरा रोड : भटके श्वान व मांजरांची सेवा करणाऱ्या शांतीनगर सेक्टर एकमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्राणिमित्र महिलेस गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारीनंतर घर रिकामे करावे लागत असल्याचा प्रकार घडला आहे. गृहनिर्माण संस्थेने या महिलेस दरमहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.प्राणिमित्र झारा नोरानी या भटके श्वान, मांजरी यांना खाऊ घालणे, त्यांना लस देणे, उपचार करणे आदी सेवा करीत आल्या आहेत. शांतीनगर सेक्टर १ च्या हर्षविहार, बी / ४१ मध्ये नोरानी गेल्या सहा ते सात वर्षांपासून भाड्याने राहतात. त्या सेक्टर १ व मीरा रोड परिसरातील श्वान, मांजरींची नियमित सेवा करतात. जखमी वा अपंग असलेल्या भटक्या मांजरींना उपचारासाठी आवश्यकता असल्यास त्या घरीच त्यांच्यावर उपचार करतात.इमारतीच्या आवारात त्या भटक्या प्राण्यांना खाऊ घालत नसल्या तरी लळा लागलेल्या मांजरी इमारतीच्या आवारातही शिरतात. त्यातूनच इमारतीतील काही रहिवासी व झारा यांच्यात वादाला तोंड फुटले. इमारतीच्या आवारात भटके प्राणी घाण करतात म्हणून काही रहिवाशांच्या तक्रारी आहेत. तर मुक्या प्राण्यांना काय कळते, पण घाण केली तर मी स्वतः जाऊन साफ करत असल्याचे झारा यांचे म्हणणे आहे.या वादातूनच सोसायटीने दरमहा एक हजारांचा दंड मेन्टेन्सच्या बिलात दोन वर्षांपासून आकारायला सुरुवात केली आहे. हा दंड कशाबद्दल आहे याचे कारण सोसायटीने लेखी दिलेले नाही. कारण स्पष्ट केल्याशिवाय हा दंड भरण्यास नकार दिला असल्याचे झारा म्हणाल्या. प्राण्यांबद्दल माणुसकी दाखविली पाहिजे. परंतु, सोसायटीच्या तक्रारींमुळे अखेर घरमालकानेही आपणास घर रिकामे करण्यास सांगितले आहे. १० फेब्रुवारीला घर रिकामे करणार असून दुसरीकडे घर शोधताना येथील प्राण्यांची देखभाल करणे कसे शक्य होणार? याची चिंता लागली असल्याचे त्या म्हणाल्या.  सोसायटी अध्यक्षांचा बोलण्यास नकारयाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष रिंकीन पटेल यांच्याशी संपर्क साधला असता रविवारी सोसायटीची मिटिंग असून त्यात त्यांच्या घरमालकाने येऊन बोलावे, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणे