शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीराम कोणाची खासगी मालमत्ता नाही, धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 06:02 IST

‘जय श्रीराम, जय बजरंगबली’ म्हटले की सर्व हिंदू त्यांच्याबरोबर जातील,  असे त्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड ( Marathi News ): आम्हाला मत द्याल, तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू, असे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. मग काय महाराष्ट्रातल्या हिंदूंना श्रीरामाचे मोफत दर्शन मिळणार नाही का? श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणाला मत दिले हे विचारून दर्शन देणार का? प्रभू श्रीराम हे तुमची खासगी मालमत्ता नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 

मीरा भाईंदर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामदेव पार्क भागात गोवर्धन पूजा कार्यक्रमात रविवारी रात्री ठाकरे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. या प्रसंगी खा. राजन विचारे, शंकर वीरकर, यादव संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष रंगबहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर. बी. यादव आदी उपस्थित होते. 

श्रीरामाचे मंदिर होतेय ही गर्वाची गोष्ट आहे. ‘जय श्रीराम’ हे हजारो वर्षांपासून म्हटले जाते. तुम्ही तर आता आलात. ‘जय श्रीराम, जय बजरंगबली’ म्हटले की सर्व हिंदू त्यांच्याबरोबर जातील,  असे त्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

धर्माची रक्षा करणारी शिवसेना

राम आणि हाताला काम देणारे आहे. नैसर्गिक आपत्ती, दंगे, अपघात कोणतीही आपत्ती आली तेव्हा शिवसैनिक जिवाची परवा न करता पुढे असतो व तेच आमचे हिंदुत्व आहे. हाच फरक आहे त्यांच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात. ९२ च्या दंगलीत शिवसेनेने हिंदूंना वाचविले. त्यावेळी भाजप कुठे होती? मुंबई जळत होती तेव्हा बाळासाहेब आणि शिवसेना होती. अधर्माच्या विरुद्ध धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, असेही ते म्हणाले. मुंबईत सर्व जण पोटापाण्यासाठी आले. पण, आता काम कुठे करणार? उद्योग-धंदे गुजरातमध्ये नेत आहेत. मग, सर्व उठून गुजरातमध्ये जाणार का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMira Bhayanderमीरा-भाईंदर