शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

केळकरांच्या मतदारसंघात लेलेंचे शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:32 IST

एकीकडे ठाणे शहरात मुख्यमंत्री येणार, याची कल्पना पोलिसांना जशी नव्हती, तशीच ती भाजपाच्या आमदारांसह इतर काही प्रमुख मंडळींनासुद्धा नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे : एकीकडे ठाणे शहरात मुख्यमंत्री येणार, याची कल्पना पोलिसांना जशी नव्हती, तशीच ती भाजपाच्या आमदारांसह इतर काही प्रमुख मंडळींनासुद्धा नसल्याची बाब समोर आली आहे. या माध्यमातून एक प्रकारे आमदार संजय केळकरांच्या मतदारसंघात भाजपा शहराध्यक्ष संदीप लेले यांनी शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा मात्र यानिमित्ताने चांगलीच रंगली आहे.अपेक्षेप्रमाणे ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणुकीअगोदरच राजकीय फटाके वाजू लागले आहेत. याची सर्वात मोठी कोंडी आमदार केळकरांची झाल्याचे दिसून येत आहे. भाजपा शहराध्यक्ष लेले यांनी मंगळवारी ठाण्यातच उघडउघड युक्तीने शक्तिप्रदर्शन करून त्यांच्यासमोर अकस्मात आव्हान उभे केले आहे.ठाणे शहर सेनेचा बालेकिल्ला केळकरांनी सर करून भाजपाचा झेंडा रोवला होता. सेनेला ही गोष्ट काळजात खीळ मारल्यासारखी आजही दुखत आहे. केळकरांनी पाच वर्षे कामांचा सपाटाही लावला आणि ते पुन्हा वनसाइड झाले होते. मात्र, लेलेंनी मंगळवारी अटल महोत्सवाच्या नावावर मोठ्या युक्तीने त्यांना अंधारात ठेवून थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच एकाच खुर्चीला खुर्ची लावून ठाणे मतदारसंघात केळकरांना कोपऱ्यात सरकवून शक्तिप्रदर्शन केले.मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी जोपर्यंत होते, तोपर्यंत केळकरही तेथे हजर होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी तेथून निरोप घेताच केळकर यांनीही तेथून काढता पाय घेतला. खरेतर, लेले हे मागच्या वेळेस कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढले होते. मात्र, यंदा आपणही ठाणे शहरात इच्छुक असून आपल्यालाही संधी हवी, असेउघड वातावरण करण्यात यशस्वी झाले आहेत.सेनेचे नरेश म्हस्केही मैदानातदुसरीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के पूर्ण तयारीत उतरले असून सेनेतला माहोल म्हस्केंना तिकीट मिळाल्यात जमा असाच आहे. शिवाय, सेना-भाजपा युती झाली, तरीही ठाणे हे आम्हालाच हवे. हवे.. म्हणजे हवेच, अशी सेनेची भूमिका ठरली आहे. त्यामुळे केळकरांच्या कोंडीचा ट्रॅफिक जॅम सहा महिने अगोदरच सुरू झाल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण