वीजमीटर काढण्याचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:57+5:302021-03-21T04:39:57+5:30
डोंबिवली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आदेश देऊनही शहरात वीजबिल न भरल्याच्या कारणाने सर्रास वीजमीटर काढण्यात येत असून ...

वीजमीटर काढण्याचे सत्र सुरूच
डोंबिवली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आदेश देऊनही शहरात वीजबिल न भरल्याच्या कारणाने सर्रास वीजमीटर काढण्यात येत असून नागरिक हैराण झाले आहेत.
शेलारनाका परिसरातील तुकाराम साबळे यांनी सांगितले की, सातत्याने आम्हाला भरमसाट बिले दिली जात आहेत. त्यात आता थेट मीटर काढण्यात येत आहेत. शासन आदेशाची पायमल्ली होत असून सामान्यांनी जगायचे तरी कसे? असा सवाल त्यांनी केला. वीजबिल पाठविल्यावर ती भरण्याची क्षमता नसेल तर टप्पे करून देण्याचे अधिकारी सांगतात, पण तरीही प्रत्यक्ष मात्र अंमलबजावणी तशी न होता मीटर काढण्याची कार्यवाही होत आहे. गोग्रासवाडी भागातही अशा समस्या भेडसावत असल्याने नागरिक हैराण आहेत. यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधी पवार तसे म्हणाले होते, पण हाऊस संपताना पुन्हा ज्यांची बिले भरमसाट आहेत त्यांचे मीटर काढण्यात यावेत, असे आदेश पारित करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.