भिवंडीच्या पौर्णिमा पाटील हिचे यश; बिकट परिस्थितीवर मात करत बनली डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 05:37 PM2021-05-15T17:37:28+5:302021-05-15T17:37:53+5:30

भिवंडी ( दि. १५ ) वैद्यकीय क्षेत्रातील बीएचएमएस परीक्षांचा निकाल नुकतात जाहीर झाला असून या वैद्यकीय क्षेत्रातील या परीक्षेत भिवंडी तालुक्यातील केवणी गावातील शेतकरी कुंटूबात जन्मलेली पौर्णिमा अंकुश पाटील ही जिद्दीने व बिकट परिस्थितीवर मात करत यश संपादन केले आहे.

Pournima Patil success Becoming a doctor overcoming a difficult situation | भिवंडीच्या पौर्णिमा पाटील हिचे यश; बिकट परिस्थितीवर मात करत बनली डॉक्टर

भिवंडीच्या पौर्णिमा पाटील हिचे यश; बिकट परिस्थितीवर मात करत बनली डॉक्टर

Next

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १५ ) वैद्यकीय क्षेत्रातील बीएचएमएस परीक्षांचा निकाल नुकतात जाहीर झाला असून या वैद्यकीय क्षेत्रातील या परीक्षेत भिवंडी तालुक्यातील केवणी गावातील शेतकरी कुंटूबात जन्मलेली पौर्णिमा अंकुश पाटील ही जिद्दीने व बिकट परिस्थितीवर मात करत यश संपादन केले आहे. बीएचएमएस परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती डॉक्टर बनली आहे. आपल्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाल्याने पौर्णिमाणे परमेश्वराबरोबरच आपल्या आई वडिलांचे देखील आभार मानले आहेत. 

पौर्णिमा हिचे वडील जवळपास दोन वर्ष हृदय विकाराच्या झटक्याने कोमा मध्ये गेले होते.त्यामुळे तिला अभ्यासात असंख्य अडचणी आल्या मात्र या सर्व अडचणींना पौर्णिमाणे मोठ्या धैर्याने सामोरे गेली. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा अभ्यास तर दुसरीकडे वडील रुग्णालयात व वडिलांच्या सेवेसाठी रुग्णलयात थांबलेल्या आईसाठी जेवण बनाविण्यापासून ते घरातील सर्व कामे पौर्णिमा हिच्या खांद्यावर आली होती. हि सर्व घरची जबाबदारी सांभाळून पौर्णिमा हिने बीएचएमएस परीक्षेचा अभ्यास देखील केला. दुर्दैव म्हणूजे काही दिवसांपूर्वीच तीचे वडील अंकुश पाटील यांचा मृत्यू देखील झाला. हे सर्व दुःख पचवून तिने वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत अभ्यास केला. 

वडील स्व.अंकुश पाटील हे किराणा दुकान चालवत असताना आपल्या मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहत होते.त्यांचे शिक्षण कमी असताना देखील एम्.एच.एफ.एस. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संगमनेर येथे जाऊन त्यांनी तिचे एडमिशन घेतले व परिस्थिती बिकट असताना देखील तिला पुढील शिक्षणासाठी कधीच अडचण भासू दिली नाही.  दोन वर्ष वडिलांच्या आजारपनामुळे मृत्यूशी झुंज देत असताना अखेर वडिलांचे निधन झाले.अशा कठीण प्रसंगी मात्र तिने आपली जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वास या जोरावर पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली व आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करून दाखविले आहे.
         
केवणी या छोट्याशा गावात पौर्णिमा डॉक्टर झाली याचा सर्व ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान वाटत आहे. तिच्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिच्या या यशा बद्दल तिने आपली आई कुंदा अंकुश पाटील,भाऊ मयूर अंकुश पाटील,भाऊ विशाल अंकुंश पाटील व सर्व कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. जर त्यांनीच मला साथ दिली नसती तर मी आज डॉक्टर झाली नसती व वडीलांचे स्वप्न साकार करू शकली नसती, माझे यश हीच माझ्या वडिलांना भावपुर्ण श्रध्दांजली आहे अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ पौर्णिमा पाटील हिने दिली आहे.

Web Title: Pournima Patil success Becoming a doctor overcoming a difficult situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे