शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; मनपा विरोधात उद्धव सेनेचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन

By नितीन पंडित | Updated: July 19, 2024 18:06 IST

शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. भिवंडी महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांना सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत उद्धव सेनेने शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी ठाकरे गटाच्या वतीने थेट रस्त्यावर उतरून खड्ड्यात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. युवा सेना शहर प्रमुख मोहन पठारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

खड्ड्यामुळे होणारा त्रास तसेच वाहतूक कोंडी यामुळे हैराण झालेली नागरीक याकडे पालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष असल्याने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या मांडून पालिका प्रशासना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले . महानगरपालिकेच्या विरोधात असलेली बॅनर पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी कऱण्यात आली.

मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरले नाहीत तर पुढील काही दिवसातच मनपा प्रशासना विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आंदोलनकरते मोहन पठारे यांनी दिली आहे

टॅग्स :BhiwandiभिवंडीPotholeखड्डे