शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

वागळे इस्टेट भागातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:47 IST

वागळे इस्टेट, किसननगर येथून १७ वर्षीय ऋषिका मकवाना आणि पडवळनगर येथून ऊर्वी गोरी या दोघी जणी बेपत्ता झाल्या आहेत. ऊर्वी एप्रिलपासून तर ऋषिका ही जून २०१७ पासून गायब आहे.

ठाणे, दि. 13 - वागळे इस्टेट, किसननगर येथून १७ वर्षीय ऋषिका मकवाना आणि पडवळनगर येथून ऊर्वी गोरी या दोघी जणी बेपत्ता झाल्या आहेत. ऊर्वी एप्रिलपासून तर ऋषिका ही जून २०१७ पासून गायब आहे. या दोघींचेही अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून श्रीनगर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.पडवळनगर येथे राहणारी ऊर्वी ही ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लहान बहीण वीराला काहीतरी खायला आणण्यासाठी घराबाहेर पडली. ती त्यानंतर घरी परतलीच नाही. तिचे कोणीतरी अपहरण केल्याची शक्यता तिची आई रेखा गोरी यांनी वर्तवली असून त्याबाबत श्रीनगर पोलीस ठाण्यात ७ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली आहे. ऊर्वीचे वय १७ वर्षे सात महिने, उंची ५ फूट ४ इंच, रंग गोरा, चेहरा गोल, डोळे तपकिरी, नाक सरळ, केस काळे, अंगाने मध्यम, अंगात लाल रंगाचा टी शर्ट आणि काळा पायजमा असे वर्णन असून तिला इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराथी आणि कच्छ अशा पाच भाषा बोलता येतात.दरम्यान, किसननगर-१ भागात राहणारी ऋषिका हिचे ९ जून २०१७ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विनय मंगेश कांबळे याने अपहरण करून तिला पळवून नेले आहे. त्याबाबत तिची आई अलका मकवाना यांनी ११ जून रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिचे वय १७, उंची ५ फूट, गहूवर्णीय, उभट चेहरा, नाक सरळ, केस काळे, मध्यम बांधा असून तिलाही गुजराथी, हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान आहे. या दोन्ही मुलींबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक यू.बी. गावडे यांनी केले आहे.

 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा