शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

महासभेच्या सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडला, सुदैवाने महापौर बचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 7:27 PM

ठाणे महापालिकेच्या महासभेच्या सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडल्याची घटना शनिवारी सांयकाळी 5.53 च्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही.

ठळक मुद्देसध्या मुख्यालयाची सुरु आहे दुरुस्तीमुख्यालय २५ वर्षे जुनी

ठाणे - ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असतांनाच सभागृहामधील पीओपीचा काहीसा भाग पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने महापौर आणि त्यांच्या समवेत आजूबाजूला बसलेला अधिकारी वर्गही बचावला आहे. परंतु या निमित्ताने सभागृहाच्या आयुर्मानावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.          शनिवारी महासभा संपत आली असतांनाच, अचनाक महापौरांच्या वरील भागातील सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडला. पालिकेने मात्र हा किंचीतसा भाग असल्याचे सांगितले आहे. सुदैवाने यातून महापौर आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले अधिकारी वर्ग यातून बचावले आहे. त्यानंतर महासभाच वेळे अभावी संपली. यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहाचे छत पडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच शनिवारी ठाणे महापालिकेतही तशीच काहीशी घटना घडल्याने सभागृहाच्या दुरुस्तीबाबत आता शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेचे संपूर्ण मुख्यालयाच हे २५ वर्षापेक्षा जास्त जूने असून त्याचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात आले होते. त्यानंतर सध्या मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु झाले आहे. परंतु असे असतांनाच शनिवारी महासभेच्या सभागृहाचे पीओपी पडल्याने दुरुस्ती बाबतही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. तसेच सभागृहाच्या दुरुस्तीचा मुद्दासुध्दा या निमित्ताने पुढे आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त