शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कोपर दिशेकडील पुलावरून डोंबिवलीत रंगले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:40 PM

डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यासाठी मनसेने मैदानात उडी घेताना पूल बंद करून नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून रेल्वे आणि महापालिकेत यासंदर्भात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पूल बंद करण्यापूर्वी केडीएमसीने वाहतुकीसंदर्भात काय नियोजन केले आहे, याबाबत केडीएमसीने दोन दिवसांत लेखी स्वरूपात मनसेला उत्तर द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.मनसेचे गटनेते हळबे यांच्यासह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी नगरसेवक हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक, युवा पदाधिकारी सागर जेधे यांनी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आदी उपस्थित होते. कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्याविषयी २० मे रोजी रेल्वे प्रशासनाने महापालिकेस पत्र दिले. २७ मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता; मात्र तो अद्याप सुरूच आहे. रेल्वे व महापालिकेत पुलाविषयी समन्वय नसल्याने गोंधळाचे वातावरण असल्याचा आरोप मनसेच्या शिष्टमंडळाने केला आहे.कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल १९८० मध्ये खुला झाला. तेव्हा डोंबिवली पूर्व-पश्चिमेची लोकसंख्या कमी होती. लोकसंख्या वाढल्याने या पुलावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलून ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती केली. हा पूल तयार झाल्यावर वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, हा पूल अर्धवट आणि अरुंद आहे. त्याचे पोहोचरस्तेही अरुंद आहेत. त्यामुळे कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण बंद न करता त्यावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवून त्याची देखभाल-दुरुस्ती करता येईल का, असा पर्याय नागरिकांना द्यावा. पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवण्याचा पर्याय दिला, तर अरुंद पोहोचरस्ते हे एकेरी वाहतुकीचे करावेत, अशी मागणी मनसेने खोडके यांच्याकडे केली. कोपर पुलाचाकोणता भाग धोकादायक आहे. त्यासाठी निविदा काढली आहे का, पुलाचे काम किती दिवसांत पूर्ण होईल. त्याची निश्चित डेडलाइन किती असेल, याचा खुलासा पालिकेने करावा. पत्रीपूल पाडला. त्याचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे कोपर पुलाचा पत्रीपूल होऊ देणार नाही, असे मनसेने स्पष्ट केले आहे.>केडीएमसीत आज बैठककोपर दिशेकडील पुलासंदर्भात रेल्वेचे अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यासोबत मंगळवारी बैठक होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता जुनेजा यांनी दिली. या बैठकीत मनसेच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याची अनुमती द्यावी. मनसेच्या स्थानिक प्रतिनिधींना पुलाविषयी चांगली माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काही मुद्दे बैठकीत उपस्थित केले जाऊ शकतात, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले.