शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

राजकारण्यांचा ४00 कोटींच्या स्टेम प्राधिकरणावर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:53 IST

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भाईंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते. मात्र, आता या प्राधिकरणाची ४०० कोटी रुपयांच्या जवळपास मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीवर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.स्टेमघर प्राधिकरण ही पाणीपुरवठा करणारी देशातील पहिली व एकमेव कंपनी आहे. २०१४ पर्यंत या कंपनीच्या अभियंत्याचे वेतन करण्याचीदेखील ऐपत नव्हती. आर्थिक डबघाईला आलेल्या या कंपनीला सावरण्यासाठी सेवानिवृत्त विवेकानंद चौधरी यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी महापालिकांकडे थकलेली पाणीपट्टी कायदेशीर बाजूने वसूल केली. आता कंपनीला गेल्या पाच वर्षांत २८० कोटी रूपये नफा प्राप्त होऊन कंपनीची मालमत्ता ४०० कोटी रुपयांची झाली आहे. या कंपनीच्या मालमत्तेवर डोळा ठेवून महापालिकांमधील काही वरिष्ठ राजकारण्यांनी या प्राधिकरणावर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी वेगवगेळ्या कुरापती सुरू केल्याचे ऐकायला मिळत आहे.उल्हास नदीवरून पाणी उचलणारे स्टेम प्राधिकरण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या काही भागासह भिवंडी, मीरा भार्इंदर आणि ठाणे महापालिका आदींमधील ४० लाख नागरिकांना पाणीपुरवठा करते. भिवंडी महापालिकेकडे १५ वर्षांपासूनची पाणीपट्टी रखडली होती. या महापालिकेसह मीरा भार्इंदर महापालिकेकडे रखडलेल्या कोट्यवधी रुपयांचे बिल लवादाच्या कायद्यानुसार वसूल करण्यात यश मिळाले आहे. आता स्टेमची ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीच्या व्यवस्थापकपदी निकटवर्तीय अभियंत्याची वर्णी लावण्याच्या काही राजकारण्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी कुरापती करून या प्राधिकरणाच्या व्यवस्थापनावर आप्तस्वकीय अभियंत्यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.नवीन यंत्रणाही उभारलीठेकेदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कायम केले आहे. याशिवाय कंपनी व्यवस्थापनाने दोन किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे. एक नवा पंपहाऊस उभा केला असून वाया जाणारे पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यास योग्य करण्यासाठी प्रकल्पही उभारला आहे.जिल्ह्यात सुरळीत पाणीपुरवठा करणारी कंपनी म्हणून आता महापालिकांचा या प्राधिकरणावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडून थकीत बिलासह दर महिन्याची पाणीपट्टीदेखील वेळेवर मिळत आहे.कंपनीचे आर्थिक उत्पन्न वाढत असल्यामुळे या सोन्याची अंडी देणाºया कंपनीवर आपला निकटवर्ती व्यवस्थापक घुसवण्यासाठी राजकारण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थापनाविरोधात यानात्या कारणाने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे.२८० कोटी रुपयांचा नफादैनंदिन पाणीपुरवठा करणाºया या कंपनीकडे जिल्ह्यातील अन्यही गावांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. स्टेम प्राधिकरणाची स्थापना २०११ ला झाली असता, त्यावेळी प्राधिकरणाकडे १७० कोटी रुपयांची मालमत्ता होती. पण अवघ्या तीन वर्षांत, म्हणजे २०१४ पर्यंत कंपनी डबघाईला येऊन ३० कोटींवर तग धरून उभी होती. आता कंपनी २८० कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. भिवंडी महापालिका दरमहा एक कोटी रुपयांच्या पाणीबिलासह थकीत रक्कम महिन्याकाठी देत आहे. पुढील वर्षभरात कंपनीची ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे