शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वैमनस्यातून ठाण्यात दोघांवर चाकू हल्ला, शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 22:46 IST

पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

ठाणे, दि. २५ - पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या हल्ल्याचे शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे हे सूत्रधार असल्याचा आरोप करीत त्यांच्या अटकेची मागणी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (२४ सप्टेंबर) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रघुनाथनगर येथील कशिश पार्क सोसायटीतील सागर मेटकरी आणि धनंजय कावळे या दोघांना सोनू पाल आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. त्यानंतर बांबू, दगड आणि चाकूनेही त्यांच्यावर हल्ला केला. यात मेटकरीच्या हातावर चाकूचा वार झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.यासंदर्भात भाजप युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश आंग्रे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांची सोमवारी दुपारी भेट घेतली. याप्रकरणी रेपाळे हे सूत्रधार असून त्यांनाही अटक झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यासाठी त्यांनी मालेकर यांना काही काळ घेरावही घातला होता. मात्र, रेपाळे यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याचे मालेकर यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु, यात कोणीही दोषी आढळले तरी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मालेकर यांनी या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिले.अशी आहे पार्श्वभूमी...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कशिश पार्क येथील स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, रुपाली रेपाळे आणि विकास रेपाळे यांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सुजाता कोळमकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुनेला आणि पतीला शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. यात त्यांच्या कुटुंबीयांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे. त्यावेळी विकास रेपाळेंनी या मंडळातील कार्यकर्त्यांना दमबाजीही केली होती. याच संदर्भात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नम्रता भोसले, रुपाली रेपाळे यांच्याविरुद्ध कोळमकर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. हाच राग मनात धरुन २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान कशिश पार्कच्या गेटवर एका टोळक्याने येणाºया जाणाºयांच्या नावांची विचारपूस केली. त्याचदरम्यान सागर आणि धनंजय हे दोघे सोसायटीच्या बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्यावर सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी हा खूनी हल्ला केल्याचा आरोप आहे. कशिश पार्कमधील सागर मेटकरीवर हल्ला केल्याच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. या घटनेशी आपला दुरान्वयेही संबंध नाही. आपण त्यावेळी अंधेरी येथे होतो. दाखल गुन्हयात कुठेही आपल्या नावाचा उल्लेख नाही. उलटपक्षी सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव हेच गेली अनेक महिने आपल्याविरुद्ध बातम्या पेरत आहेत. शिवाय, सागरने स्वत:च वार करुन घेतल्याची आपली माहिती आहे.-विकास रेपाळे, नगरसेवक, शिवसेना 

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस