शिक्षक पुरस्कार सोहळ्याला राजकीय रंग

By Admin | Updated: April 19, 2017 00:06 IST2017-04-19T00:06:24+5:302017-04-19T00:06:24+5:30

मोखाडा पंचायत समितीने सोमवारी तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. परंतु, हा कार्यक्र म शिवसेना भाजपा यांच्या राजकीय वादाचा बळी ठरल्याने रद्द करावा लागला आहे

Political color for teacher award ceremony | शिक्षक पुरस्कार सोहळ्याला राजकीय रंग

शिक्षक पुरस्कार सोहळ्याला राजकीय रंग

रवींद्र साळवे , मोखाडा
मोखाडा पंचायत समितीने सोमवारी तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. परंतु, हा कार्यक्र म शिवसेना भाजपा यांच्या राजकीय वादाचा बळी ठरल्याने रद्द करावा लागला आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हा कार्यक्र म रद्द करण्यात आला असे मोखाडा शिक्षण अधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले.
हा नियोजित कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य यांनी स्वत: सूत्रसंचालन करून शिक्षकांना शाल, श्रीफळ व रोपटे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. तालुक्यातील सात शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उदघाटन करून मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र म पत्रिकेत खासदार चिंतामण वनगा यांचे नाव नसल्याने सवरा यांनी दबाब आणून तसेच माजी आमदार विवेक पंडित आणि पत्रकार शरद पाटील या सवरांच्या कट्टर विरोधकांना आमंत्रित केल्याने हा कार्यक्र म रद्द केल्याचे प्रकाश निकम यांनी सांगितले.

Web Title: Political color for teacher award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.