शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रिक्षात २ पेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 21:51 IST

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर मध्ये २ ऐवजी ३ ते ४ प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे . या शिवाय रिक्षा स्थानक जाहीर करणे , रिक्षांवर माहितीचा स्टिकर लावणे आदी मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली . 

 

शासनाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रिक्षात २ प्रवासीच बसवण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे भाईंदर मध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षां मध्ये ३ ऐवजी २ प्रवासी घ्याचे म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहे . किमान शेअर भाडे १० रुपये होते . पण २ प्रवासी घ्यायचे म्हणून किमान शेअर भाडे १५ रुपये केलेलं आहे . त्या प्रमाणेच अंतर नुसार शेअर भाडे वाढवले आहे . उत्तन साठी तर  ३० चे ५० रुपये प्रति प्रवासी केले आहेत . 

 

एकीकडे २ प्रवासी घ्यायचे म्हणून भाडे वाढवणाऱ्या अनेक रिक्षा चालकांनी  मात्र चक्क ३ ते ४ प्रवासी भारत भाडे मात्र जास्तीचेच वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवल्याच्या तक्रारी होऊ लागल्या . रात्रीच्या वेळी तर सर्रास ३ - ४ प्रवासी भरले जातात . ह्या वरून प्रवाश्यां सोबत रिक्षा चालकांचे वाद होऊ लागले . मीटर प्रमाणे भाडे नेणे बंधनकारक असताना मीटर न टाकता मनमानी भाडे सांगितले जाते . 

 

 ह्या बाबत शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी , रिक्षा चालक , नगरसेवक सुरेश खंडेलवाल , ध्रुवकिशोर पाटील आदींची चर्चा झाली . 

 

ह्या वेळी काही रिक्षा चालकांनी ध्रुवकिशोर पाटील यांच्यावर राग व्यक्त करत तुम्ही जुने असून सर्वाना ओळखता तरी देखील आमच्या कडे अडचण न सांगता थेट सरसकट सर्व रिक्षा चालकांवर लूट करत असल्याचे आरोप करता हे योग्य नाही असे खडे बोल सुनावले . 

 

काही रिक्षा चालक जास्त प्रवासी घेतात हे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करा आम्ही मध्ये येणार नाही असे रिक्षा संघटनांनी स्पष्ट केले . रेल्वे स्थानक जवळील सुशोभीकरणाच्या कामा मुळे होत असलेली वाहतूक कोंडी , अधिकृत रिक्षा स्थानक करून देणे , बोगस व परवाने नसलेल्या रिक्षांवर कारवाई करणे आदी मुद्दे सुद्धा चर्चेत आले . 

 

ह्यावेळी भामे यांनी स्पष्ट केले कि , २ पेक्षा जास्त प्रवासी बसवल्यास रिक्षांवर कारवाई केली जाईल . प्रत्येक रिक्षा वर त्या रिक्षा आणि चालकाच्या माहितीचा तसेच प्रवाश्याना तक्रारीसाठी वाहतूक पोलिसांचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्यात येणार आहे . रेल्वे स्थानक बाहेरील सुशोभीकरणाच्या कामा मुळे रस्ता अरुंद झाला असून पालिकेला कळवले आहे . रिक्षा स्थानक बाबत पालिकेशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे भामे यांनी सांगितले . 

 

दरम्यान शेअर मार्गा बरोबरच कायद्याने बंधनकारक असलेल्या मीटर पद्धतीने भाडे आकारणी सुरु करण्या बाबत आरटीओ व पोलिसां सोबत बैठक होणार आहे . शहरात मीटर पद्धती सुरु झाल्यास प्रवाश्यांना आणि रिक्षा चालकांना सुद्धा लाभ होईल. त्यामुळे मीटर प्रमाणे भाडे घेण्याची मागणी केल्याचे  नगरसेवक सुरेश खंडेलवाल म्हणाले .