भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST2021-03-27T04:41:58+5:302021-03-27T04:41:58+5:30
भिवंडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे असून सण साजरे करताना सरकारी नियम व पोलिसांच्या सूचनांचे ...

भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज
भिवंडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे असून सण साजरे करताना सरकारी नियम व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गुरुवारी या संदर्भात बैठक झाली.
होळी, धूलिवंदन व मुस्लीम समाज बांधवांचा शबे ए बारात या सणांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुरा, कोनगाव, शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, विजय डोळस, गणपत पिंगळे यांनी शांतता समिती सदस्य, मुस्लीम बांधव व सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत सूचना देण्यात आल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी आदेशानुसार सण साजरे करताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.