दुचाकी घसरून पोलीस उपनिरीक्षक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:52+5:302021-06-27T04:25:52+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू असून, डांबरी रस्ता बनवण्यासाठी आणलेल्या खडीवरून दुचाकी घसरून काशीमीरा वाहतूक ...

दुचाकी घसरून पोलीस उपनिरीक्षक जखमी
मीरा रोड : मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू असून, डांबरी रस्ता बनवण्यासाठी आणलेल्या खडीवरून दुचाकी घसरून काशीमीरा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांचा अपघात झाला.
पाटील हे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास काम संपवून दुचाकीवरून घरी जात होते. प्लेझेंन्ट पार्क येथे रस्त्यावर डांबरीकरणाच्या कामासाठी टाकलेल्या खडीवरून दुचाकी घसरली. अपघात होऊन त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हातालाही खरचटले आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मेट्रोसह रस्त्याचे काम सुरू असल्याने पथदिवे नाहीत. अंधार असतो त्यातच रस्त्यावर बांधकाम साहित्य पडलेले असल्याने लक्षात येत नाही. दुचाकी चालकांना वाहने काळजीपूर्वक चालवावी लागतात. ठेकेदाराने खबरदारी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक म्हणतात.