गुजरात वरून आलेला ४ किलो गांजा पोलिसांनी पकडला

By धीरज परब | Updated: April 2, 2024 20:19 IST2024-04-02T20:19:20+5:302024-04-02T20:19:41+5:30

-काशीमीरा पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर  गुजरात वरून तस्करी करून आणलेला ४ किलो गांजा जप्त केला आहे . 

Police seized 4 kg of ganja from Gujarat | गुजरात वरून आलेला ४ किलो गांजा पोलिसांनी पकडला

गुजरात वरून आलेला ४ किलो गांजा पोलिसांनी पकडला

मीरारोड -काशीमीरा पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर  गुजरात वरून तस्करी करून आणलेला ४ किलो गांजा जप्त केला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समीर शेख (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह पवार, इगवे,  मोहिले, सोनकांबळे,निलेश शिंदे, सतिश निकम, रविंद्र कांबळे, राजेंद्र सुर्यवंशी यांच्या पथकाने गस्ती दरम्यान ही कारवाई  केली .

मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मन ओपस बिल्डिंग जवळील पडक्या घराजवळ पोलिसांना दोघे संशियत दिसून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडील बॅगेची तपासणी केली असता त्यात ४ किलो वजनाचा ८० हजार रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला . पारस धिरुभाई चावडा ( वय ३० वर्षे )  रा. स्वप्न व्हिला, सत्यमनगर, कामरेज, सुरत व पुष्पक महेंद्रसिंग चौहान ( वय २८ वर्षे ) रा. भगवती अव्हेन्यु, सत्यमनगर, ननसाडरोड, कामरेज, सुरत ह्या गुजरात मधून आलेल्या दोघा अमली पदार्थ तस्करांना पोलिसांनी तब्यत घेतले . त्यांचे २ मोबाईल सुद्धा जप्त केले आहेत.  एकूण  १ लाख ५ हजार किमतीचा मुद्देमाल आहे.

Web Title: Police seized 4 kg of ganja from Gujarat