अंबरनाथमध्ये पोलिसांनी केले देशी पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST2021-03-19T04:40:20+5:302021-03-19T04:40:20+5:30

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये बेकायदा पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या एका तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे ...

Police seize native pistol in Ambernath | अंबरनाथमध्ये पोलिसांनी केले देशी पिस्तूल जप्त

अंबरनाथमध्ये पोलिसांनी केले देशी पिस्तूल जप्त

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये बेकायदा पिस्तूल घेऊन वावरणाऱ्या एका तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

अंबरनाथच्या पाइपलाइन हायवे टी जंक्शन भागात जय मल्हार हॉटेल असून, या हॉटेलच्या परिसरात सोमवारी रात्री २० ते २५ वयोगटातील एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील शिपाई पिंट्या थोरवे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने जय मल्हार हॉटेलच्या परिसरात धाव घेत शोध घेतला असता एक तरुण पवार सेक्शनकडे जाणाऱ्या रोडवर संशयास्पदरीत्या उभा असलेला त्यांना दिसला. त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. सागर अनंता तवले असे त्या तरुणाचे नाव असून, तो कल्याण ग्रामीण भागातील बाळे गावात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Police seize native pistol in Ambernath