शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्यास नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 22:06 IST

रिक्षाचालकाच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळणा-या किरण विरम (२२) याला काही दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईचोरीतील मोबाइल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिक्षात बसून मोबाइलवरील गाणी ऐकत असलेल्या बिरमल शिंदे (३४, रा. मुलूंड, मुंबई) या रिक्षाचालकाच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळणा-या किरण कालीदास विरम (२२, रा. भिमनगर, ठाणे) याला काही दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.नौपाडा येथील भक्ती मंदिर रोडवर १९ जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शिंदे हे रिक्षा चालक आपल्याच रिक्षामध्ये मागील सिटवर बसून प्रवाशांची वाट पाहात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरून तिथे आलेल्या किरण विरम हा त्याचा साथीदार विजय याच्यासह तिथे आला. या दोघांपैकी मागे बसलेल्या किरण याने त्याचा मोबाइल जबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच शिंदे यांनी त्याचा काही अंतर पाठलागही केला. मात्र, आरडाओरडा झाल्याने किरणचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी पाठलाग करणा-या शिंदे यांनी मोठ्या धाडसाने त्याला स्कूटरवरून खाली खेचल्यामुळे तो खाली पडला. या दरम्यान, तिथे जमलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच प्रसाद दिला. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे आणि मोहिनी कपिले यांच्या पथकाने त्याला रविवारी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला याप्रकरणात अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचा शोध घेण्यात येत असून त्याने आणखीही अशा प्रकारे जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी