शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला

By धीरज परब | Updated: January 25, 2023 01:01 IST

२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मीरारोड -  मीरा भाईंदरमधील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत, गेल्या वर्षात आणि चालू महिन्यात घडलेल्या चोरीच्या एकूण ५१ गुन्ह्यातील तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत मिळवून दिला आहे. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ मध्ये मीरा भाईंदरची  काशिमीरा, मिरा रोड,नवघर, नया नगर, भाईंदर व उत्तन अशी ६ पोलीस ठाणी येतात. 

२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीला गेलेला ऐवज मिळेलच याची सामान्य नागरिकांना शाश्वती नसते. परंतु पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासा मुळे सदर ५१ गुन्ह्यातील १ करोड ७ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करता आला. 

पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते चोरीला गेलेला मुद्देमाल संबंधित नागरिकांना मीरारोड येथील एका कार्यक्रमात परत करण्यात आला. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक आयुक्त विलास सानप , शांतीलाल जाधव व शशिकांत भोसले सह पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी तपास करून मिळवलेल्या ३ चारचाकी , २ ऑटो रिक्षा, ८ दुचाकी , १५ मोबाईल, सोन्याचे दागिने,रोख रक्कम व इतर मूल्यवान वस्तू नागरिकांना परत करण्यात आल्या. 

पोलिसांनी चोरीला गेलेली वाहने , दागिने , मोबाईल आदी वस्तू परत मिळवून दिल्या बद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. पोलिसांचा पाहुणचार व आपुलकीचे वातावरण पाहून काही नागरिकांना गहिवरून आले. यावेळी नागरिकांनी स्वतःच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी , मदतीसाठी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसThiefचोरRobberyचोरी