शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलीस अधिकाऱ्याकडून ठाण्यात पट्ट्याने मारहाण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:38 IST

संतोष पाटील यांचा आरोप : उपायुक्तांकडे तक्रार, पोलिसांकडून आरोपांचे खंडण

ठाणे : शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी पोलीस ठाण्यात बोलवून शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप डायघर गावातील संतोष पाटील यांनी केला आहे. ही मारहाण पोलीस पाटील यांच्यासमोर केल्याचा आरोप त्यांनी परिमंडळ-१ चे उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

तक्रारदार संतोष पाटील हे डायघर पंचकृषी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहे. डायघर गावात होऊ घातलेल्या घनकचरा साठवणूक करणे व विल्हेवाट लावणे, या प्रकल्पाला कायदेशीर मार्गाने ते विरोध करत आहेत. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी या प्रकल्पाचे काही कर्मचारी तेथे मोजणी करण्यास आले होते. त्यावेळी त्यांना वरिष्ठ अधिकाºयांशी बैठक होणार असून ती झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे तोपर्यंत येथे मोजणीचे काम करू नये, असे सांगत ते निघून गेले होते. त्यानंतर, शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गावित यांनी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी साहेबांनी बोलावले असल्याचा निरोप फोनवर दिला. त्याप्रमाणे मी डायघर गावाचे पोलीस पाटील व इतर दोघे असे पोलीस ठाण्यात गेलो असता तेथील पोलीस अधिकारी बोरसे यांनी संतोष पाटील कोण आहे, अशी विचारणा करत धमकी दिली. त्यांनी एका खोलीमध्ये बसवून ठेवले. पाच मिनिटांनी तीन पोलीस कर्मचारी व बोरसे यांनी मला पोलीस कोठडीत बंद करून ठेवले. १० ते १५ मिनिटांनी बोरसे व अन्य पाच पोलीस कर्मचाºयांनी मला जावळे यांच्या कक्षात नेले. यावेळी पोलीस पाटील गजानन पाटील हे बसले होते. त्यांच्यासमोर जावळे यांनी शिवीगाळ करत कर्मचाºयांना पट्टा आणण्यास सांगितले. दोन कर्मचाºयांना मला धरण्यास सांगून जावळे यांनी माझ्या पाठीवर व डाव्या हाताच्या खांद्यावर व दंडावर मारहाण केली. त्यानंतर, त्या जागेवर गेल्यास गोळ्या घालीन, अशी धमकी दिल्याचा आरोप संतोष पाटील यांनी केला आहे.यासंदर्भात रविवारी उपायुक्त स्वामी यांना एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे आणि पोलीस उपनिरीक्षक बोरसे यांच्यासह तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याची मागणी केली.प्रसंगी मुख्यमंत्र्याची भेट घेणार; न्यायालयातही दाद मागणारच्या शिष्टमंडळात आमदार बाळाराम पाटील, लियाकत शेख, संतोष केणे, गणेश म्हात्रे, नगरसेवक बाबाजी पाटील, हिरा पाटील, गोविंद भगत, रोहिदास मुंडे आदी उपस्थित होते. तसेच कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला.च्वेळप्रसंगी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन त्याच्याकडे तक्रार करून न्यायालयातही दाद मागू, असे सांगितले. दरम्यान, संतोष पाटील याने महापालिकेच्या प्रकल्पाला विरोध केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.च्त्याला मारहाण किंवा धमकी दिलेली नाही. त्याने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी सांगितले. आणि आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा