शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक शाखेच्या उपनिरीक्षकासह पोलीस नाईकाची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 21:14 IST

एरव्ही, वाहतूकीचे नियम मोडणाºया वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारणाºया वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय जुमले यांनीच आपल्या वाहनांची पीयूसी आणि वीमा संदर्भातील कागदपत्रे अद्ययावत न ठेवल्याने त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलीस उपायुक्तांचे आदेशकर्मचाऱ्याची वाहतूक शाखेतून बदली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एरव्ही, वाहतूकीचे नियम मोडणाºया वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारणाºया वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय जुमले यांनीच आपल्या वाहनांची पीयूसी आणि वीमा संदर्भातील कागदपत्रे अद्ययावत न ठेवल्याने त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत नौपाडा युनिटच्या मच्छिद्र माळी या पोलीस नाईकाला वाहतूक शाखेतून मुख्यालयात हलविण्यात आले आहे.वाहतूक नियंत्रण शाखेच्या नौपाडा युनिटचे उपनिरीक्षक जुमले यांच्याविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी एका नागरिकाने पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यामध्ये जुमले यांच्या मोटारकार आणि मोटारसायकल या वाहनांचे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि वीमा ही कागदपत्रे नसल्याचे म्हटले होते. याबाबतची तक्रार राज्य सरकारच्या एमपरिवहन या अ‍ॅपवर देण्यात आली होती. त्याचबरोबर महागडया वस्तू खरेदी करतांना जुमले यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? याचीही विचारणा या नागरिकाने केली होती. याव्यतिरिक्तही जुमले यांच्याविरुद्ध नागरिकांना अरेरावी केल्याच्या तसेच पैसे घेतल्याच्या तक्रारी उपायुक्त कार्यालयात आल्या होत्या. याचीच दखल घेऊन उपायुक्त पाटील यांनी त्यांची सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्फतीने चौकशीचे आदेश दिले. तसेच त्यांची नौपाडा येथून व्हीआयपी वाहनांवर बदली करण्यात आली. तसेच, पोलीस नाईक माळी यांनाही यापूर्वी शिक्षा म्हणून अंबरनाथ येथून थेट नौपाडा युनिटमध्ये बदली केले होते. मात्र, त्यांच्याही विरुद्ध अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनाही आता वाहतूक शाखेतून पोलीस मुख्यालयात बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘ जुमले यांच्याविरुद्ध अरेरावीसह अनेक तक्रारी होत्या. त्यातच त्यांच्या वाहनांचे पीयूसी आणि वीमा नसल्याचीही तक्रार होती. अशा अनेक कारणामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. तर पोलीस नाईक माळी यांची मात्र वाहतूक शाखेतून मुख्यालयात बदली केली आहे.’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस