पोलिसांच्या सतर्कतेने फिलोमिनाला भेटले प्रियजन
By Admin | Updated: May 9, 2017 00:19 IST2017-05-09T00:19:05+5:302017-05-09T00:19:05+5:30
मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भटकत असलेल्या आसाम राज्यातील एका मुलीला मनोर पोलिसांनी आपल्या प्रियजनात पोहचविले आहे.

पोलिसांच्या सतर्कतेने फिलोमिनाला भेटले प्रियजन
आरिफ पटेल । लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भटकत असलेल्या आसाम राज्यातील एका मुलीला मनोर पोलिसांनी आपल्या प्रियजनात पोहचविले आहे.
मनोर मस्ताननाका रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास एक मुलगी नदी जवळ गस्त घालणारे पो उप नि पंकज पाटील यांना आढळली त्यांनी तिला जीप मध्ये बसवून हलोली येथील स्वागत आश्रम मध्ये नेले. तिची अवस्था दयनीय होती तेथील व्यवस्थापक नारकर यांनी तिची विचारपूस करून तिचा पत्ता, नाव जाणून घेतले. व ते पोलिसांना कळविले. त्या नंतर स पो नि मनोज चाळके यांनी आसाम राज्यातील जिल्हा उडालउडी होरिसंगा पोलीस ठाण्यात शोध घेतला व तेथील पो नि गोगई यांना खबर दिली त्या वरून तेथील बचपन बचाव संस्थच्या माध्यमातून कोरामुळं गावातील तिच्या घरचा पत्ता मिळाला. त्यानंतर तेथील बचपन बचाव संस्थेचे सदस्य फ्रांगलिंक डिगल व आनंद इक्का हे मनोर पोलीस ठाण्यात आले. त्या नंतर त्यांना स्वागत आश्रम हलोली येथे नेले तेथील व्यवस्थापक नितीन नारकर यांची भेट घालून दिली त्यांनी फिलोमीनाशी भेट घालून दिली असता यावेळी आसामी भाषेत झालेल्या संवादातून ओळख पटली त्यांच्या ताब्यात तिला देण्यात आले ती आता आपल्या घरी सुखरूप पाहोचली आहे
फिलोमीना हिच्याशी बातचीत केली असता ती म्हणाली आमचा परिसर खूप गरीब आहे चांगले काम देतो असे सांगून एका व्यक्तिने येथे आणले व तो पळून गेला त्यामुळे मला इकडचे काहीच समजत नव्हते. मी वेडी झाले होते रस्त्यावर फिरत होते मला रात्री पोलिसांनी आश्रमामध्ये आणले. मला नारकर यांनी जेवण दिले आंघोळ केल्यावर कपडे बदलल्यावर मी भानावर आले त्यांना व पोलिसांना माहिती दिली त्यांनी माझ्या गावाचा शोध लावून मला पुन्हा माझा कुटुंबात नेले त्या सर्वांना मी खूप धन्यवाद देते
मनोर पोलीस ठाण्याचे पो उप नि पंकज पाटील यांनी माणुसकीचे नातें दाखवून तिला आपल्या गावी, आपल्या घरी पठवण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल त्यांचे मनोर परिसरात कौतुक होते आहे.