शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नववर्ष स्वागत कार्यक्रमांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:23 IST

नववर्षाचे स्वागत जरूर करा, पण ३१ डिसेंबरला रात्री ११ नंतर विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर, गर्दी करणार्यांवर त्याचबरोबर फटाके फोडून ध्वनी आणि वायुप्रदूषण करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.

ठळक मुद्देएसआरपीएफसह पाच हजार पोलिसांचा ताफा तैनात फटाके वाजविण्याला बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नववर्षाचे स्वागत जरूर करा, पण ३१ डिसेंबरला रात्री ११ नंतर विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर, गर्दी करणार्यांवर त्याचबरोबर फटाके फोडून ध्वनी आणि वायुप्रदूषण करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. यासाठी जागोजागी नाकाबंदी केली जाणार असून राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.नववर्ष स्वागताच्या निमित्ताने रस्त्यावर गर्दी होऊ नये, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आण िउल्हासनगर येथील पोलीस उपायुक्तांसह १७ साहाय्यक पोलीस आयुक्त, १२८ निरीक्षक, १५० साहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन हजार पुरु ष आणि ९५० महिला अंमलदार तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या, दोन आरसीपी प्लाटून, दहा इतर स्ट्रायिकंग मोबाइल आणि ३०० होमगार्ड असा मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तसेच लंडन शहरासह पूर्व युरोपीय देशांमध्ये नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूचे रु ग्ण आढळून येत असून त्याचा प्रसार वेगाने होत आहे. शासनाने त्याची गांभीर्याने दखल घेत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर हा बंदोबस्त राहणार आहे. या वेळी नाकाबंदीमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर, विनाकारण फेरफटका मारण्यासाठी वाहने फिरविणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.* सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून आवाजाचे फटाके वाजविण्याला बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांनी या आदेशाचा भंग करू नये. काही कारणास्तव शहराबाहेर गेलेल्या नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी ११ वाजण्यापूर्वी घरी येण्याचे नियोजन करावे.* या काळात विविध हॉटेल्स, पब्ज, रिसॉर्ट, लॉजेस आण िइतर आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. हुक्का पार्लरसह हायवेलगतच्या ढाब्यांवरही नजर ठेवली जाणार आहे.* येऊर, उपवन, कोलशेत खाडी, तलावपाळी परिसर तसेच सोसायटीच्या आवारात विनाकारण गर्दी करू नये. नववर्षाचे स्वागत शांततेत, संयमाने आण िसुरिक्षतरीत्या करावे, असे अवाहनही पोलिसांनी केले आहे.*उड्डाणपूल राहणार बंदनववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी वाहनचालक भन्नाट वेगाने वाहने हाकतात. त्यामुळे अपघाताची भीती असते. या पाशर््वभूमीवर वाहतुकीचा अंदाज घेऊन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. चालकांनी उड्डाणपुलाऐवजी सरळ मार्गिकेचा वापर करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र